Todays Quotes -
The dogmas of the quiet past are inadequate to the stormy present. The occasion is piled high with difficulty, and we must rise with the occasion. As our case is new, so we must think anew and act anew.
- Abraham Lincoln
Novel Story - Mrugjal - Ch-12
हळू हळू प्रिया आणि विजयची मैत्री वाढू लागली . वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करणे, एकमेकांना जोक्स ऎकविणे , गप्पा मारणे असे त्यांचे चालायचे. त्यांच्या गृपमधे साहजिकच नेहमी विजयसोबत राहत असल्यामुळे राजेशचीही वर्णी लागली होती. त्यांच्या एवढ्या गप्पा व्हायच्या पण प्रिया आणि विजयच्या बहिणीचा, वडिलांचा आमना सामना झाला तेव्हापासून तिने त्यांच्याबद्दल कधी एक अवाक्षरही काढले नाही. म्हणजे तशी तिची हिम्मतच झाली नाही. किंवा विजयनेही स्वत: होवून काही सांगितले नाही. त्याच्या घरची परिस्थिती पहाल्यानंतर तिला त्याच्याबद्दल एक आदर निर्माण झाला होता. एवढ्या प्रतिकुल परिस्थितीतही पुढे जाण्याची त्याची केवढी ही जिद्द! तिला त्याच्या या गोष्टीचे नेहमी आश्चर्य आणि कुतुहल वाटायचे.
विजयच्या घरी अभ्यास होणे शक्य नसल्यामुळे तो आधी राजेशकडे अभ्यासाला जात असे. ते दोघे सोबतच अभ्यास करीत असत. पण त्याच्या मोठ्या भावाचं लग्न झाल्यापासून त्यांची ती हक्काची अभ्यासाची खोलीही आता गेली होती. या प्रश्नावर कसा तोडगा काढायचा या विचारात ते असतांनाच त्यांची प्रियासोबत मैत्री झाली होती आणि मग प्रियानेच या प्रश्नावर तोडगा काढला. तिच्या घरी ती आणि तिचे वडील असे दोघेच राहात असत. तिची आई ती चौथीत असतांनाच डिलीव्हरीमधे वारली होती. तेव्हापासून तिच्या वडीलांनी लग्न केले नव्हते. आणि तेच आता तिची आई आणि बाबा अश्या दोन्ही भूमिका पार पाडत होते. त्यांचं घर म्हणजे स्टेट बॅंकेचं क्वार्टर होतं- म्हणजे चांगलं तिन खोल्यांच घर. म्हणून मग त्यांनी तिच्या घराची समोरची बैठकीची खोली अभ्यासासाठी वापरण्याचे ठरवले.
विजय, राजेश आणि प्रिया समोरच्या खोलीत अभ्यास करीत बसले होते. तेवढ्यात प्रियाचे वडील आतून बाहेर त्या खोलीत आले. त्यांनी त्या तिघांकडे बघितले पण त्यांचं काहीही लक्ष नव्हतं. ते आपापल्या अभ्यासात एवढे गुंग होते की त्यांना प्रियाचे वडील तिथे केव्हा आले काही कळलंच नाही. त्यांच्या हातात एक पिशवी होती आणि त्यांची बाहेर कुठेतरी जाण्याची तयारी चाललेली दिसत होती. त्यांनी समोर दारापाशी जावून पायात चप्पल चढवली आणि पुन्हा त्या तिघांकडे बघितले. तरी त्यांच लक्ष त्यांच्याकडे गेलं नाही. तेव्हा त्यांनी आवाज दिला,
"" प्रिया ..''
प्रिया एकदम दचकुन भानावर येवून, जाग्यावरुन उठत म्हणाली,
'' पप्पा तुम्ही कुठे निघालात?''
विजय आणि राजेशही भानावर येवून त्यांच्याकडे बघत हसत उठू लागले. तर प्रियाचे वडील म्हणाले,
'' तुमचं चालू द्या... मी जरा बाजारात जावून येतो.. फक्त घराकडे जरा लक्ष असू द्या''
'' तुम्ही काही काळजी करु नका काका, आपचं पुर्ण लक्ष आहे'' राजेश म्हणाला.
'' हो ते आता मला दिसलंच... '' तिचे पप्पा राजेशची फिरकी घेत उपाहासाने म्हणाले.
"" मी आतून बाहेर चाललो होतो तरी तुमचं लक्ष नव्हतं... तर चोराला बाहेरुन आत येवून काहीतरी चोरुन न्यायला जास्त कष्ट पडणार नाहीत'' ते पुढे म्हणाले.
'' पप्पा... तुम्ही उगीच जास्त काळजी करता बघा .. आणि आपल्या घरात आहे तरी काय असं नेण्यासारखं...'' प्रिया लाडावून म्हणाली.
'' बरं ठिक आहे... मला उशीर होतोय... '' म्हणत ते घराच्या बाहेर पडले.
ते बाहेर गेल्यानंतर प्रियाने काहीतरी आठवल्यागत त्यांना जोराने आवाज दिला, '' पप्पा''
'' काय?'' बाहेरुन आवाज आला.
'' येतांना अजून दोनचार वस्तू घेवून या?''
'' कोणत्या?''
'' चहापत्ती, दूधाची पिशवी, आणि टूथपेष्ट'' प्रिया तिथूनच जोरात म्हणाली.
'' अजून काही?'' बाहेरुन आवाज आला.
तिच्या वडीलांच्या आवाजातली खोच लक्षात येवून विजय आणि राजेश तिच्याकडे पाहून हसले.
'' नाही बस एवढंच .. पण आठवणीने आणा .. विसरु नका''
'' हो आणतो'' बाहेरुन तिच्या वडीलांचा आवाज आला आणि पाठोपाठ स्कुटर सुरु होण्याचा आवाज आला.
'' बाय पप्पा'' प्रिया पुन्हा जोरात म्हणाली.
'' बाय'' बाहेरुन आवाज आला आणि स्कुटर तिथून निघून जाण्याचा आवाज आला.
'' प्रिया ... खरंच पण तुझे पप्पा म्हणजे ग्रेटच आहेत...'' राजेश म्हणाला.
'' यस ... माय पप्पा इज ग्रेट...'' प्रिया अभिमानाने म्हणाली.
'' पण तो तुझ्या पप्पांना ग्रेट का म्हणतो हे तर विचारशील?'' विजय म्हणाला.
'' अरे हो... का बरं तु माझ्या पप्पांना ग्रेट म्हणालास?...'' प्रिया.
'' अगं ... असंच...म्हणावं म्हटलं म्हणून म्हणालो'' राजेश.
'' आमच्याकडे एखाद्या बावळट माणसाला पण ग्रेट म्हणतात बरं'' विजय.
'' राजेश?'' प्रिया डोळे मोठे करुन म्हणाली '' तु माझ्या पप्पांना बावळट म्हणालास''
'' अगं नाही ... तो विजय आगीत तेल टाकण्याचा प्रयत्न करतो आहे'' राजेश.
'' मग सांगना तु त्यांना ग्रेट का म्हणालास?'' प्रिया.
'' खरं सांगु... तु चवथीत असतांना तुझी आई वारली... तरीही त्यांनी दुसरं लग्न केलं नाही म्हणून मला तुझे पप्पा ग्रेट वाटतात'' राजेश.
'' त्यांचं माझ्या आईवर खुप प्रेम होतं... म्हणजे अजुनही आहे... '' प्रिया शुन्यात पाहत जणू मागच्या घटना आठवत म्हणाली.
'' तुम्हाला माहीत्ये... माझ्या पप्पांच लव्ह मॅरेज होतं'' प्रिया.
'' लव्ह मॅरेज... आणि त्या काळी '' विजय आश्चर्याने म्हणाला.
'' लव्ह मॅरेज करायला काय काळ लागतो?... ते प्रेम असतं... कधी कुणावर होईल त्याचा काही नेम नसतो... आणि मग त्याच्या आड काळ, वेळ, जात, पात, असे कोणतेही बंधनं येत नसतात...'' प्रिया.
'' खरं आहे तुझं'' राजेश.
'' हो ... तुला तर ... प्रेमाबद्दल सांगितलेली कोणतीही गोष्ट खरीच वाटणार'' विजय त्याला टोमणा मारीत म्हणाला.
'' आणि त्यांचं प्रेम कसं झालं माहित्ये?'' प्रिया.
'' कसं झालं?'' दोघांनीही एकदम विचारलं.
'' ते काय झालं माहित्ये... माझी आई असेल तेव्हा 22-23 वर्षाची... तिला या व्यावहारीक जिवनाबद्द्ल अचानक विरक्ती आली आणि ती निघून गेली माऊंट अबूला'' प्रिया.
'' कशाला?''
'' कशाला म्हणजे काय ... सन्यासिन बनायला'' प्रिया.
'' मग बनली सन्यासीन'' राजेश.
'' अरे वेड्या ती संन्यासीन बनली असती तर ही आपल्या पुढे बसलेली असती ?'' विजय.
'' नाही म्हणजे मग प्रेम कसं झालं?'' राजेश.
'' ते काय झालं ... माझे वडील म्हणजे तिच्या नात्यातलेच होते... ते म्हणाले मी जातो तिला तिचं मन वळवून परत आणायला'' प्रिया.
'' मग?''
'' मग काय... ते गेले... त्यांनी तिचं मन वळवलं... पण या सगळ्या भानगडीत त्यांचं प्रेम झालं'' प्रिया.
'' वा वा... काय लव्ह स्टोरी आहे...'' राजेश.
'' नविन कॉन्सेप्ट आहे... एखादा सिनेमा नक्कीच निघू शकेल'' विजय.
'' मग?'' राजेश.
'' मग काय... प्रेम ... लग्न... आणि इचा जन्म... अजुन काय पाहिजे तुला?'' विजय.
'' पण त्यांच प्रेम म्हणजे ... एक आदर्श प्रेम होतं... कुणालाही हेवा वाटावा असं... '' प्रिया पुन्हा शुन्यात पाहात म्हणाली.
क्रमश:
No comments:
Post a Comment