Marathi Novel - Mrugjal- Ch 5 मोहिनी
त्या युवकाचा आवाजच इतका भारदस्त होता की त्या युवकाने जणू आपल्या आवाजा द्वारे शालीनीचा पुर्णपणे ताबा घेतला होता. त्याच्या त्या भारदस्त आवाजामुळे शालीनी घाबरुन आत गेली आणि तिने आत गेल्याबरोबर दाराला आतून कडी घातली. तिने दाराला कडी तर घातली पण आत सर्वत्र अंधार दिसत होता.
इतक्या अंधारात आईने आपल्याला इथे का बरं बोलावलं असेल?...
तिच्या डोक्यात प्रश्न डोकावला.
नाही नाही काही तरी गडबड दिसते ...
तिने विचार केला आणि ती दार उघडून पुन्हा बाहर पडण्यास वळली तशी तिला कॉटवर एक आकृती बसलेली असल्याचा भास झाला. तिने पुन्हा वळून त्या आकृतीकडे पाहाले. त्या अंधारात ते कोण होतं ते ओळखनं शक्य नव्हतं. तिने अंधारात आजुबाजुला भिंतीवर बल्बचं बटन शोधलं. बटन त्या कॉटच्या उशाशी वर भिंतीवर होतं. पण तिथे जावून बटण दाबन्याची तिची हिम्मत होईना.
तिने आवाज दिला, "" आई ''
पण काहीच प्रतिसाद नव्हता. ती आता मनाचा हिय्या करुन त्या कॉटजवळ गेली आणि तिने हात लांबवून कॉटच्या उशाशी असलेलं लाईटचं बटन दाबलं तसा खोलीत उजेड पसरला. आणि कॉटवर बसलेली ती आकृती आता तिला स्पष्ट दिसू लागली. तो कॉटवर बसलेला कुणीतरी दुसराच तरुण होता. तिला पाहताच त्या तरुणाने स्मित देत तिचे स्वागत केले.
'' ये बस'' तो म्हणाला.
त्या तरुणाची आणि तिची नजरा नजर झाली. त्या तरुणाच्या नजरेत जणू एक मोहीनी होती. तिची त्याच्यावरची नजर हटता हटत नव्हती. शालीनीला जाणवले की त्याच्या आवाजात अशी काही जादू होती की ती मंतरल्यागत त्या कॉटवर त्याच्या शेजारी पण त्याच्यापासून जेवढं शक्य होईल तेवढं दूर जावून बसली.
"" घाबरण्याचे काही कारण नाही'' त्याने शाश्वती दिली तशी शालीनी थोडी सैल झाली आणि तिच्या मनातली त्याच्याबद्दलची भिती नाहीशी नाही पण थोडी कमी झाली.
तो यूवक एकटक पाहात तिच्या जवळ सरकला. तिही आता त्याच्या डोळ्यात पहायला लागली. हळू हळू तिला जाणवायला लागले की त्या युवकाच्या डोळ्यात आता लाली दिसू लागली. त्या युवकाच्या चेहऱ्यावरील भावना अचानक बदलायला लागल्या. आणि त्याच्या डोळ्यातली ती लाली म्हणजे दुसरी तिसरी काही नसून त्याची वासना आहे हे तिच्या लक्षात येताच ती चमकली. तिच्यावर त्याने टाकलेल्या मोहीनीला झुगारुन जणू ती भानावर आली होती. ती उठून उभं राहण्याचा प्रयत्न करु लागली. पण तोपर्यंत तो युवक तिच्यावर एखाद्या चित्यासारखा झपटून पडला होता. आता तिच्याजवळ एकच हत्यार उरलं - ती जोरजोराने किंचाळायला लागली.
विजयने प्रियाला उद्या संध्याकाळी अशोक पार्कमध्ये भेटण्याचा निरोप दिल्याबरोबर तो आईला आपल्याकडे येतांना पाहून तिथून सटकला तर थेट आपल्या आधीच्या गृपमधे गेला. गृपमधे पोहोचल्यावर त्याने पुन्हा एकदा वळून प्रियाकडे पाहाले. तिही त्याच्याकडेच पाहात होती.
"" काय मग झाला सुसंवाद?'' एका मित्राने त्याला छेडले.
"" कसला?'' त्याने काहीही न कळाल्याचा आव आणून म्हटले.
"" बाबू ... मांजर दूध डोळे बंद करुन पिते... कारण त्याला वाटते की आपल्याला दिसत नाही आहे म्हणजे दुसऱ्यालाही दिसत नसावं'' दुसऱ्या एका मित्राने त्याला छेडले.
"" कसलं मांजर... कसलं दूध'' विजय पुन्हा काही न कळाल्याचा आव आणून म्हणाला.
"" काय मग तुमच्या हालचालींवरुन लवकरच बार वाजणार असं दिसतं.... तसं चांगलं आहे राजेशचं तर आटपलंच आता तुझा नंबर लागायला काही हरकत नाही'' त्याचे मित्र त्याला सोडायलाच तयार नव्हते.
विजय काहीतरी बोलणार तेवढ्यात अचानक लॉनच्या बाजुला असलेल्या बिल्डींगमधून कुण्या मुलीचा जोरजोरात किंचाळण्याचा आवाज यायला लागला. पुर्ण लॉन जे हंसणे, खिदळणे आणि गप्पा यांनी रंगुन गेलं होतं ते अचानक तो आवाज ऐकून स्मशानवत शांत झालं.
"" काय झाल?'' बऱ्याच जणांचा प्रश्न होता.
विजयने इतक्या दुरुनही आपल्या बहिणीचा आवाज ओळखला होता.
"" आवाज बहुतेक पहिल्या मजल्यावरुन येत असावा'' कुणीतरी बोललं.
"" चला आपल्याला तिकडे गेलं पाहिजे''
"" काहीतरी गडबड दिसते''
तो धावतच त्या दिशेने निघाला. त्याचे मित्रही त्याच्या मागे धावले. लॉनमधे स्तब्ध उभे असलेले लोक आता कार्यरत झाले होते. ते त्या बिल्डींगच्या पायऱ्याकडे गडबडीने जावू लागले. पण एवढे सगळे लोक जर एकदम पहिल्या मजल्यावर एकाच जागी जमा झाले तर अजूनच अनर्थ व्हायचा. ही शक्यता काही अनुभवी वयस्कर लोकांनी ताडली. त्यानी जे वर धावले होते त्यांना जावू दिलं आणि जे अजुन जायचे होते त्यांना त्यांनी पायऱ्याजवळच थोपवून शांत राहाण्यास सांगितलं.
विजय आणि त्याच्या मित्राचा गृप आतापर्यंत पहिल्या मजल्यावर पोहोचला होता. आवाज कुठून येतो आहे त्या दिशेचा अंदाज घेवून ते त्या दिशेने धावायला लागले.
क्रमश:..
hi post thodi mothi havi hoti plz. khup utsuk aahe
ReplyDeletecomplete novelch post kara.it is really intresting,
ReplyDeletesuspence khup ahe mast ahe pn
ReplyDeletegood story
ReplyDeletePlease post it in hindi novels Also. Because not able to read it in marathi.
ReplyDeleteKhupach sundar ahe novel.
ReplyDeletePlz post in hindi plz plz
ReplyDelete