e
विजयने सांगितल्याप्रमाणे अशोक पार्कमधे एकाजागी उभी राहून प्रिया विजयची वाट पाहत होती. तिला आठवत होते की, हिच ती जागा जिथे विजय ती आणि राजेश वेगवेगळ्या विषयांवर तासनतास चर्चा करीत बसत असत. बहूत्येक वेळा विषय अभ्यासाचाच असे. आणि अभ्यासाच्या वेगवेगळ्या विषयांवर ते वाद विवाद घालत असत आणि बहूत्येक वेळा त्यातूनच त्यांचे अभ्यासाचे डाऊट्स क्लिअर होत असत. खरोखर त्यांची अभ्यासाची पध्द्त किती चांगली होती. आणि आज ते जिथे कुठे होते तो त्या अभ्यासाचाच परिणाम होता. तुम्ही एखाद्या विषयाच्या अभ्यासात एवढे एकरुप व्हायला हवे की तुम्ही जेव्हा चर्चा करता ती त्याच विषयावर व्हायला हवी. आणि हे सगळं आपसूकच व्हायला हवं. असं विजय नेहमी सांगायचा.
पण आज कदाचित इथे वेगळ्याच विषयावर चर्चा करण्यासाठी तिला विजयने बोलावले होते, म्हणजे कमीतकमी तिची तशी अपेक्षा होती. इतके वेळा इथे भेटून ज्या विषयावर कधी चर्चा झाली नव्हती किंबहुना त्या विषयावर चर्चा करण्याची ती योग्य वेळ आणि परिस्थिती नव्हती. त्याने सांगीतले तेव्हापासून तिला सारखी ओढ लागली होती की कधी ते एकदा बगीचात येवून भेटतात. आणि म्हणूनच वेळेच्या कितीतरी आधी ती तिथे येवून पोहोचली होती. तिने एकदा घड्याळात बघितले. संध्याकाळचे साडेपाच वाजले होते. त्याने दिलेल्या वेळेला अजून अर्धा तास तरी शिल्लक होता, म्हणजे जर तो वेळेवर आला तर. तसा तो नेहमीच वेळेचा पक्का होता. आता तो उरलेला वेळ कसा घालवावा याचा विचार करीत प्रियाने बागेत चहूवार एक नजर फिरवली. शतपावली करावी तशी बागेत एक छोटी फेरी मारली. पार्कमधे जागोजागी बरीच प्रेमी युगलं बसलेली होती. तिला आठवले विजय आणि राजेश अशा जोडप्यांना पाहून नेहमीच कुत्सीतपणे हसत असत. त्यांना प्रेम म्हणजे एक प्रकारे मनाचा कमकुवतपणाच वाटायचा. पण प्रिया जरी दाखवत नसली तरी तिला त्यांच्या त्या हसण्याचा नेहमीच राग येत असे. कारण प्रेम या भावनेचा तिला नेहमीच आदर वाटत असे. आणि तिला माहित होते की जेव्हा ते स्वत: प्रेमात पडतील तेव्हाच त्यांना त्या भावनेच्या पवित्रतेची जाणीव होईल. आणि कदाचित ती जाणीव आता विजयला झाली होती आणि म्हणूनच त्याने तिला इथे पार्कमधे बोलावले होते. तिने पुन्हा एकदा आपली नजर पार्कमधे सभोवार फिरवली. आता पार्कमधे आधीपेक्षा बरेच बदल झाले होते. जी आधी सगळीकडे हिरवळ असायची तिथे आता ओसाड ओसाड वाटत होते. कदाचित आताचा माळी पार्कची व्यवस्थित काळजी घेत नसावा. किंवा तिच्या तेव्हाच्या बघण्याच्या आणि आताच्या बघण्याच्या दृष्टीकोणात बदल झाला असावा. तेव्हाचं तिचं कॉलेजचं विजयसारखे मित्र सोबत असतांनाचं जिवन खरंच किती चांगलं एखाद्या हिरव्यागार फळा फुलांनी भरलेल्या बगीच्यासारखं आल्हाददायी होतं. आणि आताचं डोईजड झालेल्या कर्तव्यांच ओझं वाहुन एखाद्या यंत्राप्रमाणे चालणारं जिवन खरोखरचं एखाद्या ओसाडं बागेसारखं होतं. विचार करता करता ती तिच्या भूतकाळात हरपून गेली.....
... प्रियाचा या शहरातील, या कॉलेजातील हा पहिलाच दिवस. तिच्या वडिलांची बदली झाल्यामुळे तिला मुंबईवरुन इथे यावे लागले होते. अकरावीपर्यंत ती मुंबईलाच शिकली होती. पण आता बारावीत तिला इथे या कॉलेजात ऍडमिशन घ्यावी लागली होती. नविन शहर, नविन कॉलेज आणि वर्गातले विद्यार्थीही नविन, सगळं काही तिच्यासाठी नविनच होतं.
बारावी असल्यामुळे आज पहिल्याच दिवसापासून रेग्यूलर क्लासेस सुरु झाले होते. आणि जवळपास सगळ्याच विषयाचे शिक्षक अकरावीची उजळणी घेत होते. आणि विद्यार्थ्यांच्या किती लक्षात आहे आणि ते किती विसरले हे तपासून पाहत होते. दोन-तिन तास झाल्यानंतर प्रियाला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की जवळपास सगळ्याच विषयाचे शिक्षक वर्गाला जेव्हा एखादा प्रश्न विचारीत आणि त्याचे उत्तर कुणालाच जर नाही आले तर मधल्या रांगेत तिसऱ्या डेस्कवर बसलेल्या विजय नावाच्या विद्यार्थ्याला त्याचे उत्तर विचारीत. आणि तो न चूकता सगळी उत्तरे देत असे. एवढे अचूककी प्रियाही त्याच्या बुद्द्दीमत्तेने प्रभावीत झाली होती. त्याच्या बुध्दीमत्तेनेच नव्हे तर त्याचे बोलणे, त्याचे निगर्वी वागणे, त्याचे निखळ हसणे, या सगळ्या बाबीने प्रिया प्रभावित झाली होती. तिने तिकडे मुंबईला हुशार विद्यार्थी पहाले नव्हते असं नाही पण तिला विजय त्या सगळ्यात वेगळा जाणवत होता. शेवटी न राहवून चौथ्या तासाला तिने तिच्या शेजारच्या विद्यार्थीनीला विचारलेच,
"" कोण तो?''
"" तो आमच्या वर्गातील सगळ्यात हुशार विद्यार्थी आहे''
"" .. ते तर दिसतेच... नाही म्हणजे त्याचं नाव काय?''
"" विजय ''
"" ते तर मी पहिल्या तासांपासून ऐकते आहे... त्याचं आडणाव काय?''
"" सावंत ''
क्रमश:...

तिने जेव्हा तिच्या वर्गात प्रवेश केला तेव्हा वर्गातल्या जवळपास सगळ्या विद्यार्थ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. कारण तिही त्यांच्यासाठी नविनच होती. नाही म्हटलं तरी ही मुंबईवरुन आलेली आहे हे ऐकुन त्यांच्यात तिच्याबद्दल एक कुतूहल होतं. आणि बॉबकट केलेली मुंबईची मॉडर्न मुलगी म्हणजे त्यांचासाठी नविनच प्रकार होता. मुंबईच्या मानाने तसं हे शहर मागासलेलंच होतं. आणि विद्यार्थ्यांच्या वागणूकीतही तिला मुंबईपेक्षा बराच फरक जाणवत होता. मुंबईची मुलं कशी डॅशिंग आणि कॉन्फीडंट वाटत आणि येथील मुलं कशी लाजरी बुजरी वाटत होती. आणि ती मुलींपासून एक अंतर ठेवूनच राहत. प्रथम तिला या सगळ्या गोष्टीचं हसू येत होतं. पण हळू हळू तिच्या लक्षात आलं की येथील मुलं डोक्याने मुंबईच्या मुलांपेक्षा कोणत्याच बाबतीत कमी नव्हती. आता त्यांच्या वागण्यावर वातावरणाचा जो पगडा होता त्याला ते तरी काय करतील बिचारी.
बारावी असल्यामुळे आज पहिल्याच दिवसापासून रेग्यूलर क्लासेस सुरु झाले होते. आणि जवळपास सगळ्याच विषयाचे शिक्षक अकरावीची उजळणी घेत होते. आणि विद्यार्थ्यांच्या किती लक्षात आहे आणि ते किती विसरले हे तपासून पाहत होते. दोन-तिन तास झाल्यानंतर प्रियाला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की जवळपास सगळ्याच विषयाचे शिक्षक वर्गाला जेव्हा एखादा प्रश्न विचारीत आणि त्याचे उत्तर कुणालाच जर नाही आले तर मधल्या रांगेत तिसऱ्या डेस्कवर बसलेल्या विजय नावाच्या विद्यार्थ्याला त्याचे उत्तर विचारीत. आणि तो न चूकता सगळी उत्तरे देत असे. एवढे अचूककी प्रियाही त्याच्या बुद्द्दीमत्तेने प्रभावीत झाली होती. त्याच्या बुध्दीमत्तेनेच नव्हे तर त्याचे बोलणे, त्याचे निगर्वी वागणे, त्याचे निखळ हसणे, या सगळ्या बाबीने प्रिया प्रभावित झाली होती. तिने तिकडे मुंबईला हुशार विद्यार्थी पहाले नव्हते असं नाही पण तिला विजय त्या सगळ्यात वेगळा जाणवत होता. शेवटी न राहवून चौथ्या तासाला तिने तिच्या शेजारच्या विद्यार्थीनीला विचारलेच,
"" कोण तो?''
"" तो आमच्या वर्गातील सगळ्यात हुशार विद्यार्थी आहे''
"" .. ते तर दिसतेच... नाही म्हणजे त्याचं नाव काय?''
"" विजय ''
"" ते तर मी पहिल्या तासांपासून ऐकते आहे... त्याचं आडणाव काय?''
"" सावंत ''
प्रियाने पुन्हा एकदा त्याच्याकडे वळून बघितले.
क्रमश:...
aadhichya kadambari vachalyavar sahajikach hya kadambarikadun aamchya expectetion khup aahet aani tya kharyahi hot challyat thanks
ReplyDeletevachnyat samadhan milat ahe
ReplyDeletejanukahi whatat ahe ki amhi t.v. var sireal pahun rahalo ahot .
ReplyDeleteit's amezing........
vaishali
interesting...........
ReplyDeletevery interesting!!!!!!!!!
ReplyDeleteNice
ReplyDelete