बंगल्याच्या आवाराच्या गेटजवळ एक रिक्षा येवून थांबला. रिक्षातून गणेशराव खाली उतरले. खादीचा नेहरुशर्ट पायजामा आणि कलप लावलेले कुळकुळीत काळे केस. रिक्षातून उतरल्याबरोबर त्यांनी नेहरु शर्टच्या उजव्या खिशातून पाच रुपयाची नोट काढून रिक्षावाल्याच्या हवाली केली आणि लांब लांब पावले टाकीत ते बंगल्याकडे निघाले. तेवढ्यात त्यांना पाठीमागून आवाज आला, '' साहेब...''
त्यांनी वळून बघितले.
'' साहेब हा घ्या एक रुपया... चारच रुपए झाले '' रिक्षावाला एक रुपयाचे नाणे हात लांबवून पुढे करीत म्हणाला.
'' राहू दे..'' गणेशराव बेफिकीरपणे हात वर करुन म्हणाले.
आणि पुन्हा बंगल्याच्या फाटकाकडे चालू लागले. त्यांच्या चालण्यात आज एक आत्मविश्वास दिसत होता.
बंगल्याच्या आवारात प्रवेश करताच आजुबाजुच्या झाडांखाली जमलेल्या गर्दीकडे विशेष लक्ष न देता ते सरळ बंगल्यात घुसले. आजही नेहमीप्रमाणे मधूराणीला भेटण्यासाठी लोकांची गर्दी होती. गणेशरावांनी कुठेही न बिचकता, कुठेही न अडखळता सराईतपणे कागदावर आपले नाव लिहून तो कागद आत्मविश्वासाने तिथे काऊंटरवर बसलेल्या माणसाच्या स्वाधीन केला आणि बाट पाहत खुर्चीवर बसण्यासाठी हॉलमधे एका बाजुला जावू लागले. आजही कुठे खुर्च्या रिकाम्या नव्हत्या. तिथे जाताच तेथील चारपाच खेडूत अदबीने 'या बसा साहेब' असे म्हणत अदबीने उठून उभे राहात त्यांना जागा देवू लागले. ते त्यांना ओळखत नव्हते. कदाचित ही त्यांच्या आत्मविश्वासाची किंवा खादीच्या कपड्याची कमाल होती. खरोखरच आज त्यांना जग पुर्णपणे बदलल्याप्रमाणे जाणवत होते. नव्हे जग तेच होते, पण ते स्वत: बदलले होते. आज खुर्चीवर बसून त्यांना जास्त वाट पहावी लागली नाही. लवकरच त्यांच्या नावाचा पुकारा झाला. पुकारा होताच दारात उभ्या असलेल्या कुणाचीही तमा न बाळगता ते त्याच आत्मविश्वासाने सरळ आत गेले.
मधूराणीच्या कॅबिनजवळ येताच, न अडखळता, कुणाचीही परवानगी न घेता ते दार ढकलून आत गेले. आत मधूराणी जणू त्यांची वाटच पाहत होती.
'' या गणेश..'' तिने हसतमुखाने त्यांचे एकेरीत स्वागत केले.
तेही हसत अगदी सहजपणे तिच्या शेजारी जावून बसले. त्यांच्यात आलेल्या बदलाचे त्यांना स्वत:लाच आश्चर्य वाटत होते.
खरोखर एखादी गोष्ट माणसाला एवढी सामर्थ्यवान बनवू शकते?...
हो त्यांच्याजवळ मधूराणीची अशी काही माहिती होती की जिच्यामुळे ते सामर्थवान झाले होते.
काही क्षण काही न बोलता निघून गेले. दोघेही एकमेकांच्या चेहऱ्यावरचे भाव जाणून घेण्याचा प्रयत्न करीत होते. गणेशरावांनी सरळ मुद्द्यालाच हात घातला, '' संदिपरावांबद्दल कळले... त्यांच फार वाईट झालं'' ते सरळ तिच्या डोळ्याला डोळे भिडवून बोलले.
'' हो ना..'' मधूराणी पटकन आपली नजर दुसरीकडे हटवीत म्हणाली.
गणेशरावांनी हेरले की प्रथमच ती त्यांच्या नजरेला नजर देत नव्हती.
'' त्यांचा मुलगाही बराच मोठा आहे वाटतं?'' गणेशराव पुढे म्हणाले.
'' हो ना... राजकारणाची आता त्याच्या वडीलाची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावर येवून पडली आहे'' मधूराणी म्हणाली.
'' म्हटलं त्यालाही एकदा भेटून घ्यावं..''
मधूराणीने चमकून त्यांच्याकडे पाहाले तसे ते पुढे म्हणाले, '' नाही म्हणजे... सात्वंनपर..''
गणेशरावांचा जो काय समजायचा तो गर्भित इशारा मधूराणीने कदाचित जाणला होता.
'' आज सकाळपासून लोकांना भेटून भेटून कंटाळा आला आहे... चला वर जावून थोडं निवांत बसूया'' मधूराणी एकदम विषय बदलून म्हणाली.
आपल्या सोडलेल्या शस्त्राने योग्य ते काम साधले हे पाहून गणेशरावांना मनोमन आनंद झाला होता. पण तसे चेहऱ्यावर काहीही न दाखविता ते म्हणाले, '' चालेल''
मधूराणी उठून दरवाजाकडे जात म्हणाली, '' या इकडे ... असं..''
त्यांनी मधूराणीच्या डोळ्यात बघितले.
तिच ती आर्त नजर...
तोच तो जिवाचा कालवा कालव करणारा कटाक्ष...
पण आज प्रथमच गणेशराव मोठ्या हिमतीने तिच्या नजरेला नजर देत होते.
ती आता पुढे पुढे चालू लागली आणि गणेशराव मंतरल्यागत तिच्या मागेमागे चालू लागले. त्यांची किती दिवसांची सुप्त इच्छा आज पुर्ण होण्याची खात्री त्यांना वाटू लागली होती.
मधूराणीने गणेशरावांना दुसऱ्या मजल्यावर नेवून सरळ आपल्या शयनगृहात नेले. शयनगृह नाना प्रकारच्या किमती वस्तूंनी थाटलेलं होतं. एवढ्या किमती वस्तू गणेशराव कदाचित प्रथमच बघत होते. पण चेहऱ्यावर तसे काहीही न दाखविता त्यांनी शयनगृहात येताच मधूराणीचा हात आपल्या हातात घेवून तिला आवेगाने आपल्या बाहुपाशात ओढून घेतले.
खरोखर माणूस जेव्हा आपल्या जिवावर उदार होतो तेव्हा त्याच्यात केवढी हिम्मत येते...
यावेळी मधूराणीने काहीही प्रतिकार केला नाही. जणू तिही त्यांच्या बाहुपाशात जाण्यासाठी आतूर होती. आणि नंतर ज्या ज्या गोष्टी घडत गेल्या त्यात गणेशरावांचा जेवढा सहभाग होता तेवढाच, कदाचित त्याहीपेक्षा जास्त मधुराणीचाही सहभाग होता.
क्रमश:
This is turning point!!! Waiting for next post. All the best Sir!!!!
ReplyDeletehi
ReplyDeletenext chap kevha yenar.
waiting.
Likhan tar surekh aahech ,tyachsobat kahanihi uttakanthawardhak aahe...
ReplyDeleteOnline kadambari wachnyachi mejwani dilyabaddal dhanyawad.
Tumhala hardik subhechhya..
Likhan tar surekh aahech ,tyachsobat kahanihi uttakanthawardhak aahe...
ReplyDeleteOnline kadambari wachnyachi mejwani dilyabaddal dhanyawad.
Tumhala hardik subhechhya..
wah kay mast turn ahe goshticha...
ReplyDeletenxt chap chi waat pahat ahe..
EKDUM SAHI!!!
ReplyDeletenahitar kantala yayala lagala hota.
Plz post regular n fast
Are tichya aassa ghol aahe kai.
ReplyDelete--------------------Sonpatki