वाचा काही निवडक प्रतिक्रिया - प्रतिक्रिया
गणेशराव अंघोळ आटोपून आपले कपडे घालत होते. पांढरा टेरीकॉटचा सदरा आणि पांढरा त्याच कापडाचा नाड्याचा पायजामा. त्यांच्या हालचालीवरून वयाच्या पन्नाशीच्या मानाने त्यांच शरीर जरा जास्तच थकलेलं दिसत होतं. काय करणार वयापेक्षा बीपी, शूगर, अॅसीडीटी अशा वेगवेगळया व्याधींनीच त्यांना जास्त हैराण करून सोडलं होतं. त्यांना आठवलं...आपण जेव्हा तरुण होतो पँट शर्ट घालायचो...
तेही सुरवातीला इन वैगेरे करून .... अगदी टापटीप...
खरंच माणसात कसा हळू हळू बदल होतो...
आजुबाजूच्या परिस्थितीचा माणसावर किती मोठा पगडा असतो...
इकडे गणेशरावांची कपडे घालण्याची गडबड आणि तिकडे स्वयंपाकघरात बायकोची भांडयाची आदळआपट आणि तोंडाची वटवट चालू होती - नेहमीप्रमाणे.
"'25 वर्ष झाले नोकरी करता अन्... इतके वर्ष झाले ....काय कमावलं तर डीपार्टमेंटमध्ये थोडीसुध्दा ओळख नाही... चांगलं इथं तालूक्याचं गाव होतं... अन् त्यातल्या त्यात आपलं घरही इथं होतं... धरलं त्या लोकांनी आणि बदली करून दिलं 70 किलोमिटर दूर फेकून ... कोण्या खेडेगावात... म्हणजे त्यांची कायमची कटकट दूर झाली... मी कितीदा म्हणत होते... जास्त इमानदारी काय कामाची नाही ... इमानदार लोकांनाच असं भोगावं लागतं"....''
गणेशरावांच्या डोक्यात एक वाक्य येऊन गेलं-
'स्ट्रेट ट्रीज आर कट र्फस्ट' ...
आपल्या बाबतीत लागू पडते का?...
पडते थोडं थोडं...
कुणाचं वाक्य आहे हे?...
कोणत्या पुस्तकातलं आहे?...
काही आठवत नाही ...
पण याच अर्थाचं काहीतरी आपल्या चाणक्यानं संस्कृतमध्ये लिहून ठेवलय म्हणे...
त्यांच्या बायकोची बडबड चालूच होती
''... पण ऐकणार कोण ... मी अडाणी पडते ना ... पुस्तकी ज्ञानापेक्षा व्यवहारी ज्ञान केव्हाही श्रेष्ठ ... पण ऐकतय कोण माझं डोंबलं...''
आता मात्र गणेशरावांना राहावलं गेलं नाही. पुस्तकी ज्ञानाचा उल्लेख त्यांच्या जिव्हारी लागला होता.
'' ... आता तू जरा तूझी वटवट बंद करशील ... चाललो ना आता ... त्याच्यासाठीच तर चाललो ना बंगल्यावर ...''
ते चिडून म्हणाले.
'' म्हणजे माझ बोलणं तुम्हाला वटवट वाटते तर... इतके वर्ष संसार करून मीच सांभाळत आले तुम्हाला म्हटलं ...मागच्या वेळेस माझ्या भावाने मदत नसती केली तर न जाणे कुठे सडत पडले असते नोकरी करत...''
'' तो तुझा भाऊ गप्पाडया ... कसला करतो मदत ... गप्पा करतो नुसत्या''
गणेशरावही आता भांडायच्या मूडमध्ये आले.
'' हे बघा ... सांगून ठेवते ... माझ्या माहेरच्यांना काही म्हणायचं नाही''
त्यांची बायको म्हणाली.
'' अन् म्हटलं तर काय करशील... सोडून देशील मला''
'' हं हेच तर पाहिजेना तुम्हाला ... सोडून दिलं म्हणजे नवी कोरी बायको आणता येते ना..''
तेवढयात आतून त्यांचा 25-26 वर्षाचा मुलगा विन्या तिथे आला. तो चांगला आडदांड आणि चेहऱ्याने राकट होता.
'' ए चूप ... एकदम चूप'' तो जोराने ओरडला.
'' सालं ... इथं जीनं मुश्कील करून टाकलं या थेरडयांनी''
आता मात्र दोघंही एकदम गप्प झाले.
आता काय म्हणावं आजकालच्या पोरांना ...
एकदम थेरडा म्हणतो मायबापांना...
पण जाऊ दे कमीत कमी अजूनतरी आहो जाहो करतो...
तेवढ्यावरच समाधान मानायला पाहिजे...
त्यांच्या मुलाने रागाने एकदा दोनदा आतबाहेर चकरा मारल्या आणि गणेशरावांचं अजूनही संथ गतिने चाललेलं पाहून म्हणाला
'' मग जायचं ना बंगल्यावर ?''
'' हो... हे बघ झालंच'' गणेशराव घाई करत असल्याचं दाखवून म्हणाले.
'' अन् नुसतं तुमच्या बदलीचं घेऊन बसू नका... माझ्या नोकरीचं बघा ... तेच सगळयात महत्वाचं आहे''
'' हो...'' गणेशरावच्या तोंडातून निघाले.
विन्या काळं टी शर्ट आणि खाली जिन्सचा पँट घालून तयार होता.
'' तू हे कपडे घालणार?...' "
'' हो काय झालं याला?... ''
'' तो दिवाळीला घेतलेला ड्रेस घालकी ... त्या लोकांसमोर हे टी शर्ट अन् हा पँट चांगला नाही दिसणार"
"" चांगला दिसणार नाही?... त्यांना म्हणावं हा असा आहे माझा पोरगा... अन् आजकाल हीच फॅशन आहे"''
'' अरे पण... ''
'' तुम्ही ते माझ्या कपड्याबिपड्याचं बघू नका... त्यांना काय बोलायचं... कसं बोलायचं ते फक्त बघा.'"
गणेशराव काहीच बोलले नाही. त्यांनी 'आता काय बोलणार याला?' अशा अविर्भावात फक्त हवेत हात फिरवला.
क्रमश:...
Best quotes -
Perfection is achieved, not when there is nothing more to add, but when there is nothing left to take away.
—Antoine de Saint-Exupéry
Sahi... Agdi Gharoghari matichya chuli Mhatla tari chalel...
ReplyDeleteChhan surwat aahe
nice start plz post nxt chapters as soon as possilble
ReplyDeletenice start plz post nxt chapter as soon as possible.........
ReplyDeletevery nice sotry
ReplyDeletegood
ReplyDeleteGood Start
ReplyDeleteKHUPACH CHANGLI WATLI
ReplyDeletehonesty is not a good POLICY
ReplyDeletegood
ReplyDeletesuruwat tar changli aahe. pudhil bhag vachayala hava.
ReplyDeletesurwat chhan aahe ! pudhe kay ? break ke baad ! chala chaha piun yeto !
ReplyDeletenice start.................
ReplyDeletehonesty is best policy, but need some smart work.
ReplyDeletesunder survvat , dekho aage aage hota hai kya?
ReplyDeletepramod
ReplyDeletei like such novels
03/05/2010
story is very nice what is next?
ReplyDeletekamlesh ....
ReplyDeletegood story
Starting very nice
ReplyDeletesuruvat tari chan vatli....
ReplyDeleteKhupach chhan suruwat aahe. Purna Katha mi wachtoch aahe... Marathi Sahityala aankhi buland kara....
ReplyDeletechaan story aahe, phudhil bhag lavkar pradarshit kara
ReplyDeleteआयुष्य संपत गेल स्वताचा विचार करायचा राहूनच गेला ....
ReplyDeleteमुलाचं भवितव्य आणि मातारपण यांचाच विचार करायचा आता
tarun mulanchi befikiri n urmatpana chan chitrit kela aahe...
ReplyDeletegood start
ReplyDeletevery good. sagdynchy gari hech chalta.. he disun ale. nice starting.
ReplyDeletenovel has a good start.
ReplyDeletesurvati varun vatay bichare ganeshrao........
ReplyDeleteIts real fact 2day
ReplyDeleteSuPerb start !!!
ReplyDeletekharach he vachlyavar aaplya aai babana kasas vatat asel ha vichar karun far vait vattay
ReplyDeleteसर्वसाधारण माणसाला इमानदारीने नोकरी करून फक्त बदलीच मिळते तर सर्वसाधारण वडीलांनी कष्ट करून मुलाला वाढवून जेव्हा त्या वडीलांना थेरड्या म्हटले जाते तेव्हा त्याच सर्वसाधारण नोकरदाराला व वडीलांना स्ट्रेट ट्रीज आर कट र्फस्ट असे वाटण्यात काहीच वावगे नाही
ReplyDelete