Valuable thoughts -
Do the right thing. It will gratify some people and astonish the rest.
--- Mark Twain [Samuel Langhornne Clemens] (1835-1910)
स्टेला आणि जाकोबचा आता त्या खडकाळ गुहेत गिब्सनचा शोध घेत इकडे तिकडे हिंडण्याचा रोजचाच परिपाठ झाला होता.
स्टेलाने आणि जाकोबने आपापला टॉर्च सुरु करुन त्याचा प्रकाश झोत खडकाळ गुहेत आजुबाजुला फिरविला. सगळीकडे कशी भयाण शांतता होती. त्या भयाण शांततेचा भंग एका त्यापेक्षा भयाण आवाजाने केला - कुण्यातरी श्वापदाचा काहीतरी खाण्याचा आवाज. कदाचित तोच हिंस्त्र पशू असावा, जो त्या गुहेत हरवलेल्या माणसांचे मांस खात असावा. त्या हिंस्त्र पशूचा विचार येताच त्यांच्या चेहऱ्यावर भय पसरलं. स्टेला चांगलीच भ्याली होती. तिने करकचून, अगदी घट्ट जाकोबचा हात पकडला. जाकोबने आपल्या टॉर्चच्या प्रकाशाचा झोत जिकडून आवाज येत होता त्या दिशेला फिरविला. त्याने प्रकाशाचा झोत तिकडे फिरविताच त्यांना आता गुरगुरण्याचा आवाज येवू लागला. त्यांच्या अंगावर भितीने काटे उभे राहाले. थोड्या वेळाने तो गुरगुरण्याचा आवाज बंद झाला.
गुहेत दुसरीकडे टॉर्चच्या प्रकाशाचा झोत फिरवित असतांना त्यांना एका जागी एका अनकुचीदार खडकाच्या टोकाला एक कापडाचा तूकडा अडकलेला दिसला. ते हळू हळू, सावकाश त्या कापडाच्या तूकड्याकडे जायला लागले, कारण त्या श्वापदाची भीती अजूनही त्यांच्या मनात होतीच. ते तिकडे चालत असतांना त्या श्वापदाचा काहीतरी चावण्याचा आवाज पुन्हा, यावेळी जोरात, जवळच कुठेतरी येवू लागला. जाकोबने प्रकाशाचा झोत तिकडे फिरवीला. त्यांना एक भयानक जबडा एका मृत देहाचे मांस तोडून खातांना दिसला. ते भितीने जणू जागच्या जागी थिजून गेले होते. त्या जबड्याने मांस खाण्याचे थांबविले. एक अनैसर्गीक शांतता वातावरणात पसरली. ते स्वत:ला सावरु शकतील त्यापुर्वीच अचानक त्या श्वापदाने त्यांच्या दिशेने झेप घेतली. जाकोब आणि स्टेला दोघेही भितीने किंचाळले. पण ते श्वापद त्यांच्या अंगावर न झेपावता त्यांच्या समोरून त्याने धूम ठोकली होती. त्यांच्या टॉर्चच्या प्रकाशाने त्या श्वापदाचा पाठलाग केला तेव्हा कुठे त्यांना कळले की ते एक मोठं जंगली कुत्र होतं. त्या कुत्र्याने चपळतेने बरोबर 'डी-एक्झीट' विहिरीत उडी मारली होती. ते कुत्रं आहे हे समजताच जाकोब आणि स्टेलाने सुटकेचा निश्वास सोडला. त्याना एक क्षण त्या कुत्र्याचं आश्चर्य वाटलं.
त्या कुत्र्याला कसं कळलं असेल की ती विहिर म्हणजे 'डी' लेव्हलमधून बाहेर पडण्याचा रस्ता आहे...
'' काय हूशार प्राणी आहे!..'' जाकोबच्या तोंडून निघालं.
'' होना.. '' स्टेलाने लागलीच तिच्या अजुनही आश्चर्याने उघडं तोंड असलेल्या स्थितीत दूजोरा दिला.
'' पण तो कसा काय या गुहेत जिवंत राहू शकला?'' स्टेलाने विचारले.
'' का?... तो एक हूशार प्राणी आहे... त्याला जिवंत राहण्याचा हक्क आहे ... मला वाटतं हा कुत्रा त्याच्या वासाच्या ज्ञानासे इथे तग धरु शकला असला पाहिजे...'' जाकोबने आपले मत व्यक्त केले.
'' पण पाण्याचं काय?'' स्टेलाने विचारले.
'' इथे पाणीही आहे... एका कोणत्यातरी लेव्हल 'बी' च्या ब्लॅकहोलमध्ये पाणीही आहे'' जाकोबने माहिती पुरवली.
ज्या खडकांच्या आडोशातून तो कुत्रा बाहेर निघाला, आता ते तिकडे वळले. तिथे त्या खडकाच्या मागे एक मृत शरीर उबडे पडलेले होते. जाकोब त्या शरीराच्या अजून जवळ गेला. स्टेलाने आपला श्वासोच्छवास जवळजवळ रोखूनच धरला. जेव्हा जाकोबने त्या शरीराला हाताला धरुन सुलटे केले. तो एका माणसाचा मृतदेह होता, ज्याचा चेहरा अर्धवट खाल्लेला होता आणि डोळे बाहेर आलेले होते. स्टेलाने भितीने आणि त्या मृतदेहाची किळस वाटून आपला चेहरा दोन्ही हाताने झाकून घेतला. जेव्हा जाकोबने तो अर्धवट खाल्लेला चेहरा निरखून पाहला तेव्हा त्याच्या लक्षात आले होते की तो त्या खेड्यातल्या माणसाचा मृतदेह होता ज्याचा मुलगा चेंडू खेळतांना विहिरीत पडला होता.
नंतर स्टेला आणि जाकोब जिथे त्यांना एका खडकाच्या टोकाला एक कापडाचा तूकडा अडकलेला दिसला होता तिथे पोहोचले. स्टेलाने तो कापडाचा तूकडा तिथून काढला आणि ती आपल्या टॉर्चच्या उजेडात तो व्यवस्थित निरखून पाहू लागली. अचानक तिचा चेहरा पांढरा फटक पडला, हाता पायात कंपन सूटलं आणि डोळ्यात अश्रू आले.
'' हा तर गिब्सनचा शर्ट आहे'' कसाबसा तिच्या तोंडातून रडवेला आवाज निघाला.
अचानक तिला जाणवले की तिच्या पायातली संपूर्ण शक्ती जणू संपली आहे. ती मटकन जमिनीवर खालीच बसली. तिने दोन्ही हाताने आपलं तोंड झाकून घेतलं आणि ती गुडघ्यात तोंड लपवून ओक्साबोक्शी रडायला लागली. जाकोबही तिच्या शेजारी जमिनीवर बसला आणि तिच्या खांद्यावर थोपटत तिला धीर देण्याचा प्रयत्न करु लागला.
क्रमश:...
Valuable thoughts -
Do the right thing. It will gratify some people and astonish the rest.
--- Mark Twain [Samuel Langhornne Clemens] (1835-1910)
Marathi Books, Marathi poems, Marathi axioms, Marathi mhani, Marathi gani, Marathi utsav, Marathi pilgrimage, Marathi yatra, Marathi novels, Marathi novella, Marathi stories, Marathi gosti, lagukatha
No comments:
Post a Comment