वाचा काही निवडक प्रतिक्रिया - प्रतिक्रिया
डिटेक्टीव्ह बेकरने सांगण्यास सुरवात केली -
'' काही दिवसांपूर्वी माझ्याकडे एक केस आली होती........
.... एक सुंदर शांत टाऊन. टाऊनमध्ये हिरवंगार गवत आणि हिरवीगार झाडे चहूकडे पसरलेली होती. आणि त्या हिरवळीत रात्री तारे जसे आकाशांत चमकतात तशी पुंजक्यासारखी तुरळक तुरळक शांत घरं इकडे तिकडे विखुरलेली होती. त्याच हिरवळीत गावाच्या अगदी मधे एक पुंजका म्हणजे एक जुनी कॉलेजची बिल्डींग होती.
कॉलजमध्ये व्हरंड्यात मुलांची गर्दी जमली होती. कदाचित ब्रेक टाईम असावा. काही मुलं घोळक्यात गप्पा मारत होते तर काही जण इकडे तिकडे मिरवत होते. जॉन कार्टर साधारण बाविशीतला, स्मार्ट हॅंन्डसम कॉलेजचा विद्यार्थी आणि त्याचा मित्र ऍथोनी क्लार्क. दोघे सोबत सोबत बाकीच्या कॉलेच्या विद्यार्थ्यांच्या घोळक्यातून वाट काढीत चालले होते.
'' ऍंथोनी चल बरं डॉक्टर अल्बर्टच्या क्लासमध्ये जावून बसू.. बऱ्याच दिवसांचा आपण त्याचा क्लास अटेंड केला नाही '' जॉन म्हणाला.
'' कुणाच्या? डॉक्टर अल्बर्टच्या क्लासमध्ये? ...तुला आज बरं बिरं तर आहे ना?..'' ऍन्थोनीने आश्चर्याने विचारले.
'' अरे नाही ... म्हणजे अजून तो आहे का सोडून गेला ते जावून बघूया '' जॉन म्हणाला.
दोघंही एकमेकांना टाळी देत कदाचीत आधीचा एखादा किस्सा आठवत जोराने हसले.
मुलांच्या घोळक्यातून चालता चालता अचानक जॉनने ऍन्थोनीला कोपर मारीत बाजूने जाणाऱ्या एका मुलाकडे त्याचं लक्ष आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. ऍन्थोनीने प्रश्नार्थक मुद्रेने जॉनकडे बघितले.
जॉन हळू आवाजात त्याच्या कानाशी पुटपुटला '' हाच तो पोरगा ... जो आपल्या होस्टेलमध्ये आजकाल चोऱ्या करतो आहे''
तोपर्यंत तो पोरगा त्यांना क्रॉस होवून गेला होता. ऍन्थोनीने मागे वळून बघितले. होस्टेलमध्ये ऐन्थोनीच्याही काही वस्तू एवढ्यात चोरी गेल्या होत्या.
'' तुला कसं काय माहित?'' ऍन्थोनीने विचारले.
'' त्याच्याकडे बघ जरा... कसा भामटा वाटतो तो'' जॉन म्हणाला.
'' अरे नुसतं वाटून काय उपयोग ... आपल्याला काही पुरावा तर लागेल ना'' ऍन्थोनी म्हणाला.
'' मला ऍलेक्सही म्हणत होता ... रात्री बेरात्री उशीरापर्यंत भूतासारखा तो होस्टेलमध्ये फिरत असतो''
'' असं का ... तर मग चल ... साल्याला धडा शिकवू या''
'' असा की साला कायमचा याद राखेल''
'' नुसतं याद च नाही तर त्याला होस्टेलमधून आणि कॉलेजातूनही बाद करु या.''
पुन्हा दोघांनी काही तरी ठरविल्याप्रमाणे एकमेकांची जोरात टाळी घेतली आणि जोरात हसायला लागले.
क्रमश:...
nice
ReplyDelete