Ch-5: मांसाचा तूकडा ( Marathi Sahitya - Ad-Bhut )(कादंबरी - अद्-भूत) (Marathi)

Next Chapter Previous Chapter

This Novel in English



वाचा काही निवडक प्रतिक्रिया - प्रतिक्रिया


बाहेर कॉलनीतल्या प्लेग्राऊंडवर लहान मुलं खेळत होती. तेवढ्यात सायरन वाजवित एक पोलीसांची गाडी तिथून बाजूच्या रस्त्यावरुन धावू लागली. सायरनचा कर्कश्य आवाज एकताच काही खेळणारी छोटी मुलं कावरीबावरी होवून आपआपल्या पालकांकडे धावू लागली. पोलिसाची गाडी आली तशी वेगात तिथून निघून गेली आणि समोर एका वळणावर उजवीकडे वळली.

पोलिसांची गाडी सायरन वाजवित एका घराजवळ येवून थांबली. गाडी थांबल्याबरोबर डिटेक्टीव्ह सॅमच्या नेतृत्वाखाली एक पोलिसांची तुकडी गाडीतून उतरुन त्या धराकडे धावली.

'' जरा घराच्या आजुबाजुबाजुलासुध्दा बघा'' सॅमने त्यातल्या दोघा साथीदारांना बजावले. ते दोघे बाकी साथीदारांना सोडून एकजण घराच्या डाव्या बाजुने आणि दुसरा उजव्या बाजूने पहाणी करीत घराच्या मागच्या बाजूला धावत जावू लागले. बाकीचे पोलिस आणि सॅम धावत येवून घराच्या दरवाजाजवळ जमले. त्यातल्या एकाने, जेफने घराच्या बेलचं बटन दाबलं. बेल तर वाजत होती पण आत काहीच चाहूल दिसत नव्हती. थोडा वेळ वाट पाहून जेफने पुन्हा बेल वाजवली, या वेळेला दारही ठोठावले.

'' हॅलो ... दार उघडा'' एका जणाने दार ठोठावत आत आवाज दिला.

पण आत काहीच चाहूल नव्हती. शेवटी चिडून सॅम म्हणाला, '' दार तोडा ''

जेफ आणि एकदोन जणं मिळून दार अक्षरश: बडवित होते.

'' अरे इथे धक्का मारा''

'' नाही आतली कडी इथे असेल.. इथे जोराने धक्का मारा''

'' अजून जोराने''

'' सगळेजण नुसते ढकलू नका ... कोणीतरी आम्हाला गार्ड करा''

सगळ्या गडबडीत शेवटी एकदाचे दार त्यांनी धक्के मारुन मारुन तोडले.

दार तोडून उघडताच सगळी टीम घरात घूसली. डिटेक्टीव्ह सॅम हातात बंदूक घेवून काळजीपुर्वक आत जावू लागले. त्यांच्या पाठोपाठ हातात बंदूक घेवून बाकीचे एकमेकांना गार्ड करीत आत घुसू लागले. आपआपली बंदूक रोखत ते सगळेजण पटापट घरात सर्वत्र पसरण्यासाठी सरसावले. पण हॉलमध्येच एक विदारक दृष्य त्यांच्यासाठी वाढून ठेवले होते. जसे त्यांनी ते दृष्य बघितले, त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता. त्यांच्यासमोर सोफ्यावर पॉल पडलेला होता, गळा कापलेला, सगळ्या वस्तू अस्ताव्यस्त झालेल्या, डोळे बाहेर आलेले, आणि डोकं एका बाजूला लूढकलेलं. त्याचाही खुन अगदी त्याच पध्दतीने झालेला होता. वस्तू अस्ताव्यस्त विखूरलेल्या होत्या त्यावरुन असे जाणवत होते की त्यानेही मरायच्या आधी बरीच तडफड केली असली पाहिजे.

'' घरात इतरत्र शोधा '' सॅमने आदेश दिला.

टीममधले तिनचारजण घरात खुन्याचा शोध घेण्यासाठी इतरत्र विखुरले.

'' बेडरुममधेही शोधा '' सॅमने ते जात असतांना त्यांना बजावले.

डिटेक्टीव्ह सॅमने खोलीत चहोवार एक नजर फिरवली. सॅमला टिव्हीच्या स्क्रिनवर ओघळलेला रक्ताचा ओघोळ आणि वर असलेला मांसाचा तूकडा दिसला. सॅमने इन्व्हेस्टीगेशन टीम मधल्या एकाला खुनावले. तो लागलीच टिव्हीजवळ जावून तेथील पुरावे गोळा करायला लागला. नंतर सॅमने हॉलच्या खिडक्यांकडे बघीतले. यावेळीही सगळ्या खिडक्या आतून बंद होत्या. अचानक सोफ्यावर पडलेल्या कशाने तरी सॅमचं लक्ष आकर्षीत केलं गेलं. तो तिथे गेला, जे होतं ते उचलून बघितलं. तो एक केसांचा गुच्छ होता, सोफ्यावर बॉडीच्या शेजारी पडलेला. ते सगळेजण कधी आश्चर्याने त्या केसाच्या गुच्छाकडे पाहत तर कधी एकमेकांकडे. इन्व्हेस्टीगेशन टीममधल्या एकजणाने तो केसांचा गुच्छ घेवून प्लास्टीकच्या पिशवित पुढच्या तपासासाठी सिलबंद केला. जेफ कावरा बावरा होवून कधी त्या केसांच्या गुच्छाकडे पाहत होता तर कधी टिव्हीवरच्या मांसाच्या तुकड्याकडे. त्याच्या डोक्यात... त्याच्याच काय बाकीच्यांच्याही डोक्यात एकाच वेळी बरेच प्रश्न घोंगावत होते. पण विचारणार कुणाला ?


क्रमश:...

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

6 comments: