Ch-4: पॉल रॉबर्टस ( Oline Marathi Novel - Ad-Bhut )(कादंबरी - अद्-भूत) (Marathi)

Next Chapter Previous Chapter

This Novel in English



वाचा काही निवडक प्रतिक्रिया - प्रतिक्रिया


पॉल रॉबर्टस, काळा रंग, पंचविशीच्या आसपास, उंची पाऊने सहा फुटाच्या आसपास, कुरुळे केस, आपल्या बेडरुममध्ये झोपलेला होता. त्याची बेडरुम म्हणजे सगळीकडे अस्तव्यस्त पडलेला पसारा होता. वर्तमान पत्रे, मॅगेझीन्स, व्हिस्कीच्या रिकाम्या बॉटल्स इकडे तिकडे विखुरलेल्या. मॅगेझीन्सच्या कव्हर्सवर बायकांची नग्न चित्रे होती. आणि बेडरुमच्या भिंतीवर सर्वत्र त्याच्या आवडत्या हिरोईन्सचे अर्धनग्न, नग्न चित्रे चिटकविलेली होती. स्टीव्हनच्या आणि याच्या बेडरुममध्ये तसं बरच साम्य होतं. फरक एवढाच होता की याच्या रुमला दोन खिडक्या होत्या पण त्या आतून बंद होत्या. आणि बंद होत्या त्या रुम एसी असल्यामुळे नव्हे तर बहूधा खबरदारी म्हणून असाव्यात. तो आपल्या जाड, मऊ, रेशमी गादीवर तशीच जाड, मऊ, रेशमी उशी छातीशी घेवून वारंवार आपला कड बदलवित होता. कदाचित तो डिस्टर्ब्ड असावा असं जाणवत होतं. बराच वेळ त्याने झोपण्याचा प्रयत्न केला पण झोप काही येत नव्हती. शेवटी कड बदलूनही झोप येत नसल्याने तो उठून बेडच्या खाली उतरला. पायात स्लीपर चढवली.

काय करावं? ...

असा विचार करीत पॉल किचनकडे गेला. किचनमध्ये जावून किचनचा लाईट लावला. फ्रीजमधून पाण्याची बॉटल काढली. एका दमात त्याने मोठमोठे घोट घेत जवळ जवळ सगळी बॉटलच रिकामी केली. आणि मग ती बॉटल तशीच हातात घेवून तो किचनमधून बाहेर सरळ हॉलमध्ये आला. हॉलमध्ये पुर्ण अंधार होता. पॉल अंधारातच एका खुर्चीवर बसला.

चला थोडा वेळ टिव्ही तरी बघुया...

असा विचार करीत त्याने बाजूचं रिमोट घेवून टिव्ही सुरु केला. जसा त्याने टीव्ही सुरु केला त्याचा चेहरा पांढरा फटक पडला, डोळे विस्फारले गेले, चेहऱ्यावर घाम फुटला आणि त्याचे हातपाय थरथर कापायला लागले. त्याच्या समोर नुकताच सुरु झालेल्या टीव्हीच्या काचावर एक रक्ताचा ओघोळ वरुन खालपर्यंत आला होता. घाई घाईने तो उठून उभा राहाला, गोंधळला आणि त्याने तश्याच घाबरलेल्या स्थीतीत खोलीतला लाईट लावला.

खोलीत तर कुणीच नव्हते...

त्याने टीव्हीकडे बघीतले. टिव्हीच्यावर एक मासाचा तोडलेला लोळा होता आणि त्यातूनच रक्त खाली ओघळत होतं.

अडत अडखळत तो टेलीफोनजवळ गेला आणि थरथरत्या हाताने त्याने एक नंबर डायल केला.

क्रमश:...

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

4 comments: