वाचा काही निवडक प्रतिक्रिया - प्रतिक्रिया
" मृत्यू गळा कापल्यामुळे झाला असं यात नमुद केलं आहे आणि गळा जेव्हा कापला तेव्हा स्टीव्हन कदाचित झोपेत असावा किंवा बेसावध असावा असं नमुद केलं आहे पण कोणतं हत्यार वापरण्यात आलं असावं याचा काही पत्ता लागत नाही आहे" तो ऑफिसर माहिती पुरवू लागला.
" ऍ़मॅझींग ?" डिटेक्टीव सॅम जसा स्वतःशीच बोलला.
'' आणि तिथे सापडलेल्या केसांचं काय झालं?''
'' सर ते आम्ही तपासले ... पण ते माणसाचे केस नाहीत''
'' काय माणसाचे नाहीत? ...''
'' मग कदाचीत भूताचे असतील...'' तिथे येत एक ऑफिसर त्यांच्यामध्ये घुसत गंमतीने म्हणाला.
जरी त्याने गमतीने म्हटले असले तरीही ते एकमेकांच्या तोंडाकडे पाहत दोन तिन क्षण काहीच बोलले नाहीत. खोलीत एक अनैसर्गीक शांतता पसरली होती.
'' म्हणजे खुन्याच्या कोटाचे वैगेरे असतील'' सॅमच्या बाजूला बसलेला ऑफिसर सांभाळून घेत म्हणाला.
'' आणि त्याच्या मोटीव्हबद्दल काही माहिती?''
'' घरातील सगळ्या वस्तू तर जागच्या जागी होत्या... काहीही चोरी गेलेले दिसत नव्हते... आणि घरात कुठेही स्टीव्हनच्या हाताच्या आणि बोटांच्या ठश्यांशिवाय इतर कुणाचेही ठसे सापडले नाहीत. '' ऑफिसरने माहिती पुरवली.
'' जर खुनी भूत असेल तर त्याला मोटीव्हची काय गरज'' पुन्हा तो तिथे उभा असलेला ऑफिसर गमतीने म्हणाला.
पुन्हा दोन तिन क्षण शांततेत गेले.
'' हे बघा ऑफिसर ... इथे हे सिरीयस मॅटर सुरु आहे ... अन कृपा करुन अश्या फालतू गमती करु नका'' सॅमने त्या ऑफिसरला बजावले.
'' मी स्टीव्हनची फाईल बघीतली आहे... त्याचा आधीचा रेकॉर्ड काही चांगला नाही ... त्याच्या विरोधात आधी बऱ्याच गुन्ह्याच्या तक्रारी आहेत... काही सिध्द झालेल्या आणि काहींबाबतीत अजुनही केसेस सुरु होत्या.. यावरुन तरी असं वाटतं की आपण जी केस हाताळत आहोत ती एखादी आपआपसातील वितूष्ट किंवा रिव्हेंजसारखी केस असु शकते.'' सॅम पुन्हा मुळ मुद्यावर येत म्हणाला.
'' खुन्याने जर गुन्हेगारालाच मारले असेल तर... '' बाजूच्या ऑफिसरने पुन्हा गंमत करण्यासाठी आपले तोंड उघडले तर सॅमने त्याच्याकडे रागाने एक कटाक्ष टाकला.
'' नाही म्हणजे तसे जर असेल तर ... बरंच आहेना ... तो आपलंच काम करतो आहे ... म्हणजे जे कदाचीत आपणही करु शकत नाही तो ते करतो आहे '' तो गंमत करणारा ऑफिसर आता जरा सांभाळून बोलला.
'' हे बघा ऑफिसर ... आपलं काम लोकांची सेवा करणे आणि त्यांचं संरक्षण करणे आहे''
'' गुन्हेगाराचंही?'' त्या ऑफिसरने कडवटपणे विचारले.
यावर सॅम काहीच बोलला नाही किंबहुना यावर उत्तर देण्यासाठी कदाचित त्याच्याजवळ शब्द नसावेत.
क्रमश:...
I like to read suspense stories. this story is excellent. swapnil yelwande.
ReplyDeleteInteresting...
ReplyDeleteinteresting
ReplyDeletesuper..
ReplyDelete