Ch- 2: पुरावा ( Online Marathi Novel - Ad-Bhut )

Next Chapter Previous Chapter

This Novel in English



वाचा काही निवडक प्रतिक्रिया - प्रतिक्रिया


सकाळी रस्त्यावर लोकांची आपआपल्या कामावर जाण्याची घाई चाललेली होती. त्यामुळे रस्त्यावर बरीच वर्दळ चालू होती. अश्यातच अचानक एक पोलीसांची गाडी त्या ट्रफिकमधून धावायला लागली. सभोवतालच वातावरण पोलीसाच्या गाडीच्या सायरनमुळे गंभीर झालं होतं. रस्त्यातले लोक पटापट त्या गाडीला रस्ता देत होते. जे पैदल जाणारे होते ते भितीयूक्त उत्सुकतेने त्या गाडीकडे वळून वळून पाहात होते. ती गाडी निघून गेल्यावर थोडावेळ वातावरण तंग राहालं आणि मग पुन्हा पूर्ववत झालं.


एक पोलीसांचा फोरेन्सीक टीम मेंबर उघड्या बेडरुमच्या दरवाज्याजवळ इन्वेस्टीगेशन करीत होता. तो त्याच्या जवळच्या जाड भिंगातुन जमीनीवर काही सापडते का ते शोधत होता. तेवढ्यात एक शीस्तीत चालणाऱ्या बुटांचा 'टाक टाक' असा आवाज आला. तो इन्व्हेस्टीगेशन करणारा वळून पहायच्या आधीच त्याला करड्या आवाजात विचारलेला प्रश्न ऐकायला मिळाला '' कुठे आहे बॉडी ? ''

'' सर इकडे आत ..'' तो टीम मेंबर आदराने उठून उभा राहत म्हणाला.

डिटेक्टीव सॅम व्हाईट, वय साधारण पस्तीस-छत्तीस, कडक शिस्त, उंच पुरा , कसलेलं शरीर, त्या टीममेंबरने दाखविलेल्या दिशेने आत गेला.

डिटेक्टीव सॅम जेव्हा बेडरुममध्ये शिरला त्याला स्टीवनचं शव बेडवर पडलेलं दिसलं. त्याचे डोळे बाहेर आलेले आणि मान एका बाजूला वळलेली होती. बेडवर सगळीकडे रक्तच रक्त पसरलेलं होतं. त्याचा गळा लोळा तोडल्यागत कापलेला होता. बेडच्या स्थीतीवरुन असं जाणवत होतं की मरण्याच्या आधी स्टीव्हन बराच तडफडला असावा. डिटेक्टीव सॅमने बेडरुममध्ये आजूबाजूला नजर फिरवली. फोरेन्सीक टीम बेडरुममधेही तपास करीत होती. एक जण कोपऱ्यात ब्रशने काहीतरी साफ केल्यागत काहीतरी करीत होता तर अजून एकजण खोलीतले फोटो घेण्यात व्यस्त होता.

एका फोरेन्सीक टीमच्या मेंबरने डीटेक्टीव सॅमला माहिती पुरविली -

" सर मयताचे नावं स्टीव्हन स्मीथ'

' फिंगरप्रींटस वैगेरे काही मिळालं का?"

' नाही आत्तापर्यंत तरी नाही'

डिटेक्टीव सॅमने फोटोग्राफरकडे पाहत म्हटले, '' काही सुटलं नाही पाहिजे याची काळजी घ्या''

'' यस सर '' फोटोग्राफर आदबीने म्हणाला.

अचानक सॅमचं लक्ष एका अनपेक्षीत गोष्टीकडे आकर्षीत झालं.

तो बेडरुमच्या दरवाज्याजवळ गेला. दरवाज्याचं लॅच आणि आजुबाजुची जागा तुटलेली होती.

'' म्हणजे खुनी हा दरवाजा तोडून आत आला वाटतं'' सॅम म्हणाला.

जेफ, साधारणत: पस्तीशीतला, बुटका, जाड, त्यांचा टीम मेंबर पुढे आला, '' नाही सर, खरं म्हणजे हा दरवाजा मी तोडला... कारण आम्ही इथे पोहोचलो तेव्हा दरवाजा आतून बंद होता.''

'' तु तोडला?'' सॅम आश्चर्याने म्हणाला.

'' यस सर''

'' काय पुन्हा आधीचे कामधंदे सुरु केले की काय?'' सॅम गंमतीने पण चेहऱ्यावर तसं न दाखविता म्हणाला.

'' हो सर ... म्हणजे नाही सर''

सॅम ने वळून एकदा खोलीत चहुवार आपली दृष्टी फिरवली, विषेशत: खिडक्यांवरुन. बेडरुमला एकच खिडकी होती आणि तीही आतून बंद होती. बंद असणं साहजिकच होतं कारण रुम एसी होती.

'' जर दार आतून बंद होतं... आणि खिडकीही आतून बंद होती ... तर मग खुनी खोलीत आलाच कसा...''

सगळेजण आश्चर्याने एकमेकांकडे पाहू लागले.

'' आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो आत आल्यावर बाहेर कसा गेला?'' जेफ म्हणाला.

डिटेक्टीव्हने फक्त त्याच्याकडे रोखुन बघितले.

अचानक सगळ्यांचं लक्ष एका इन्वेस्टीगेटींग ऑफिसरने आकर्षीत केलं. त्याला बेडच्या आजुबाजुला काही केसांचे तुकडे सापडले होते.

'' केस? ... त्यांना व्यवस्थीत सिल करुन पुढच्या तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवा' सॅमने आदेश दिला.

क्रमश:...

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

12 comments:

  1. Ad-bhut is very nice and always incourage me to read next topic.

    ReplyDelete
  2. thdasa picture sarkha watale good

    ReplyDelete
  3. vishal charolikar..March 11, 2011 at 1:50 AM

    mastach ahe....pudhe kay..????

    ReplyDelete
  4. hi kadmabari mi ajun purn read nahi keli
    thodi ka hoina mla hi kadmabari khupch aavdli aahe ,ek manje mla novels read karayla khup aavdate..Arjun B. Chawla.

    ReplyDelete
  5. mast aahe khup aawadli

    ReplyDelete
  6. Like special scodd serial :) vry nice

    ReplyDelete