वाचा काही निवडक प्रतिक्रिया - प्रतिक्रिया
तिला बिचारीला काय वाटलं असेल...
एवढ्या सगळ्या मित्रांच्या समोर आणि मेरीच्या समोर आपण ...
नाही आपण असं करायला नको होतं...
पण आपण तर चुकीने असं केलं...
आपल्याला काय माहित की तो चोर नसून नॅन्सी आहे...
नाही आपल्याला तिची माफी मागायला हवी...
पण काल तर आपण तिची माफी मागण्याचा प्रयत्न केला...
तर तिने धाडकण रागाने दार बंद केलं होतं...
नाही आपल्याला ती जोपर्यंत माफ करणार नाही तोपर्यंत माफी मागतच राहावं लागणार...
त्याच्या डोक्यात विचारांचं काहूर उठलं होतं. तेवढ्यात तासाची घंटा झाली. मधला ब्रेक होता.
चला हा चांगला चान्स आहे...
तिला माफी मागण्याचा...
तो उठून तिच्याजवळ जाणार इतक्यात ती मुलींच्या घोळक्यात नाहीशी झाली होती.
ब्रेकमुळे कॉलेजच्या व्हरंड्यात विद्यार्थ्यांची गर्दी झाली होती. छोटे छोटे समूह करुन गप्पा मारत विद्यार्थी सगळीकडे विखूरलेले होते. आणि त्या समुहातून रस्ता काढत जॉन आणि त्याचे दोन मित्र त्या गर्दीत नॅन्सीला शोधत होते.
कुठे गेली?...
आता तर पोरींच्या घोळक्यात वर्गाच्या बाहेर जातांना आपल्याला दिसली होती...
ते तिघे जण इकडे तिकडे पाहत तिला शोधायला लागले. शेवटी त्यांना एकाजागी कोपऱ्यात एका समुहात आपल्या मित्रांसोबत गप्पा करतांना ती दिसली.
''चला रे...'' जॉन आपल्या मित्रांना म्हणाला.
'' आम्ही कशाला ... आम्ही इथेच थांबतो... तुच जा'' त्याच्या मित्रापैकी एकजण म्हणाला.
'' अबे... सोबत तर चला'' जॉनने त्यांना जवळ जवळ पकडूनच नॅन्सीजवळ नेले.
जेव्हा जॉन आणि त्याचे मित्र तिच्या जवळ गेले तेव्हा तीचं लक्ष त्यांच्याकडे नव्हतं. ती आपली गप्पांत रंगून गेली होती. नॅन्सीने गप्पा करता करता एक नजर त्यांच्यावर टाकली आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. जॉनने तिच्या अजून जवळ जावून तिचं लक्ष आपल्याकडे आकर्षीत करण्याचा प्रयत्न केला. पण ती वारंवार दुर्लक्ष करीत होती. दुरुन व्हरंड्यातून जाता जात ऍन्थोनी जॉनकडे पाहून गालातल्या गालात हसला आणि अंगठा दाखवून त्याने त्याला बेस्ट लक विश केलं.
'' नॅन्सी ... आय ऍम सॉरी'' जॉनला एवढ्या मुला मुलींच्या गर्दीत लाजही वाटत होती पण तो हिम्मत करुन म्हणाला.
नॅन्सीने एक कॅजूअल नजर त्याच्यावर टाकली.
जॉनचा उडालेला गोंधळ पाहून त्याच्या मित्राने पुढची सुत्र हाती घेतली.
'' ऍक्च्यूअली आम्ही एका चोराला पकडण्याचा प्रयत्न करीत होतो'' तो म्हणाला.
'' हो ना ... तो रोज होस्टेलमध्ये चोऱ्या करत होता..'' दुसरा मित्र म्हणाला.
जॉन आता कसाबसा सावरला होता. त्याने पुन्हा हिम्मत करुन आपले पालूपद सुरु केले, '' नॅन्सी ... आय ऍम सॉरी ... आय रियली डीडन्ट मीन इट... मी तर त्या चोराला पकडण्याचा ...''
जॉन वेगवेगळे हावभाव करुन तिला पटवून देण्याचा प्रयत्न करीत होता. तो काय बोलत होता आणि काय हावभाव करीत होता त्याचे त्याला कळत नव्हते. शेवटी एका हावभावाच्या पोजीशनमध्ये तो थांबला. जेव्हा तो थांबला तेव्हा त्याच्या लक्षात आले की जरी स्पर्ष करीत नसले तरी त्याचे दोन्ही हात पुन्हा तिच्या उरोजांच्या वर होते. नॅन्सीच्याही ते लक्षात आले. त्याने पटकन आपले हात मागे घेतले. तिने रागाने एक दृष्टीक्षेप त्याच्याकडे टाकला आणि पुन्हा एक जोरात त्याच्या कानाखाली लगावली.
'' डांबरट'' ती चिडून म्हणाली.
जॉन पुन्हा सावरुन काही बोलण्याच्या आत ती रागाने पाय आपटत तिथून निघून गेली होती. जेव्हा तो भानावर आला ती दूर निघून गेली होती आणि जॉन आपला गाल चोळीत उभा होता.
क्रमश:...
good posts till
ReplyDeletegood posts till
ReplyDeletekya thappad ahe nancy...[:D]
ReplyDeletenice
ReplyDeleteto good
ReplyDeleteMasta
ReplyDeleteMasta
ReplyDeletevaa donhi hath..
ReplyDelete