वाचा काही निवडक प्रतिक्रिया - प्रतिक्रिया
रात्री होस्टेलच्या व्हरंड्यात गाढ अंधार होता. व्हरंड्यातले लाईट्स एक तर कुणी चोरले असावे किंवा पोरांनी फोडले असावेत. एक काळी आकृती हळू हळू त्या व्हरंड्यात चालत होती. आणि तिथून थोड्याच अंतरावर जॉन, ऍन्थोनी आणि त्यांचे दोन मित्र एका खांबाच्या मागे लपून दबा धरुन बसले होते. त्यांनी मनाशी पक्के केले होते की आज कोणत्याही परिस्थीतीत या चोराला पकडून होस्टेलमध्ये होणाऱ्या चोऱ्या थांबवायच्या. बऱ्याच वेळापासून ते ताटकळत त्या चोराची वाट पाहत बसले होते. शेवटी ती आकृती त्यांना दिसताच त्यांचे चेहरे आनंदाने एकदम उजळून निघाले.
चला इतका वेळ थांबलो...एवढी मेहनत केली ... शेवटी फळाला आली...
आनंदाच्या भरात त्यांच्यात कुजबुज सुरु झाली.
'' ए शांत ... हा सगळ्यात चांगला मौका आहे साल्याला रंगे हात पकडायचा'' जॉनने सगळ्यांना बजावले.
ते तिथुन लपत लपत समोर जावून एका दुसऱ्या खांबाच्या आडोशाला लपले.
त्यांनी चोराला पकडण्याची पुर्ण प्लॅनींग आणि पुर्वतयारी केली होती. चौघांनी आपापसात आपापलं काम वाटून घेतलं होतं. चौघांपैकी एक मुलागा आपल्या खांद्यावर एक काळं ब्लॅंकेट सांभाळत होता.
'' ए.. बघा तो तिथं थांबला...साल्याची घोंगड रपेटच करु'' जॉन हळूच म्हणाला.
ती आकृती व्हरंड्यात चालता चालता एका रुमसमोर थांबली होती.
'' अरे कोणाची ती रुम ?'' एकाजणाने विचारले.
'' मेरीची..'' ऍन्थोनी हळू आवाजात म्हणाला.
ती काळी आकृती मेरीच्या दरवाजासमोर थांबली आणि मेरीच्या दरवाजाच्या कीहोल मध्ये आपल्या जवळील चाबी घालून फिरवू लागली.
'' ए त्याच्याजवळ चाबीपण आहे'' कुणीतरी कुजबुजला.
'' मास्टर की दिसते'' कुणीतरी म्हणालं.
'' किंवा डूप्लीकेट करुन घेतली असणार साल्याने''
'' आता तर तो बिलकुल मुकरु शकणार नाही... आपण त्याला आता रेड हॅंन्डेड पकडू शकतो'' जॉन म्हणाला.
जॉन आणि ऍन्थोनीने मागे पाहून त्यांच्या दोघा मित्रांना इशारा केला.
'' चला ... ही एकदम सही वेळ आहे'' ऍन्थोनी म्हणाला.
ती आकृती आता कुलूप उघडण्याचा प्रयत्न करु लागली.
सगळ्यांनी एकदम त्या काळ्या आकृतीवर धावा बोलला. ऍन्थोनीने त्या आकृतीच्या अंगावर त्याच्या मित्राच्या खांद्यावरचे ब्लॅंकेट टाकले आणि जॉनने त्या आकृतीला ब्लॅकेटसहित घट्ट आवळून पकडले.
'' आधी चांगला झोडा रे साल्याला'' कुणीतरी ओरडले.
सगळेजण मिळून आता त्या चोराला लाथा बुक्याने चांगले बदडू लागले.
'' कसा सापडला रे.. चोरा''
'' ए साल्या ... दाखव आता कुठं लपवला आहेस तू होस्टेलचा चोरलेला सगळा माल''
ब्लॅंकेटच्या आतून 'आं ऊं' असा दबलेला आवाज येवू लागला.
अचानक समोरचा दरवाजा उघडला आणि मेरी गोंधळलेल्या अवस्थेत बाहेर आली. तिला तिच्या खोलीसमोर चाललेल्या गोंधळाची चाहूल लागली असावी. खोलीतल्या लाईटचा उजेड आता त्या ब्लॅंकेटमध्ये पकडलेल्या चोराच्या अंगावर पडला.
'' ए काय चाललय इथे'' मेरी घाबरलेल्या आवस्थेत हिंमतीने बोलण्याचा आव आणीत म्हणाली,.
'' आम्ही चोराला पकडलं आहे'' ऍन्थोनी म्हणाला.
'' हा तुझं दार डूप्लीकेट चाबीने उघडत होता'' जॉन म्हणाला.
त्या चोराला ब्लॅंकेटसकट पकडलेलं असतांना जॉनला त्या चोराच्या अंगावर काहीतरी वेगळच जाणवलं. गोंधळलेल्या स्थीतीत त्याने ब्लॅंकेटच्या आतून त्याचे हात घातले. जॉनने हात आत घातल्यामुळे त्याची त्या आकृतीवरची पकड ढीली झाली आणि ती आकृती ब्लॅंकेटमधून बाहेर आली.
'' ओ माय गॉड नॅन्सी! '' मेरी ओरडली.
नॅन्सी कोलीन त्यांच्याच क्लासमधली एक सुंदर लाघवी विद्यार्थीनी होती. ती ब्लॅकेटमधून बाहेर आली होती आणि अजूनही गोंधळलेल्या स्थीतीत जॉनने तिचे दोन्ही उरोज आपल्या हातात पक्के पकडलेले होते. तिने स्वत:ला सोडवून घेतले आणि एक जोरात जॉनच्या कानाखाली ठेवून दिली.
जॉनला काय बोलावे काही कळत नव्हते तो म्हणाला, '' आय ऍम सॉरी .. आय ऍम रियली सॉरी ''
'' वुई आर सॉरी ...'' ऍन्थोनी म्हणाला.
'' पण इतक्या रात्री तु इथे काय करीत आहेस '' मेरी नॅन्सीजवळ जात म्हणाली.
'' इडीयट ... आय वॉज ट्राईंग टू सरप्राईज यू... तूला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला आले होते मी'' नॅन्सी तिच्यावर चिडून म्हणाली.
'' ओह ... थॅंक यू ... आय मीन सॉरी ... आय मीन आर यू ओके?'' मेरी गोंधळलेल्या अवस्थेत म्हणाली.
मेरीने नॅन्सीला रुममध्ये नेले. आणि जॉन पुन्हा माफी मागण्यासाठी रुममध्ये जावू लागला तसे दार धाडकन त्याच्या तोंडावर बंद झाले.
क्रमश:...
Birthday cake chorayacha vichar hota vatate.
ReplyDeleteit's very nice
ReplyDeletenice
ReplyDelete