आज ऑफिसला जाण्यासाठी घरुन थोडा लवकरच निघालो. पण एक आफत टाळायला जावं तर ती दुसरं रुप घेवून तुमच्या समोर उभी राहाते ... याचा मला थोड्याच वेळात साक्षात्कार झाला. बससाठी अर्धा तास शिल्लक होता. आता काय करावं? विचार करता करता आठवलं....
" टाईम पास करण्यासाठी मार्केटिंगपेक्षा दुसरा कोणता चांगला पर्याय नाही... काही विकत घ्यायची गरज नाही... फक्त विचारपूस करायची...' पु. ल. देशपांडेंनी आपल्या एका पुस्तकात लिहून ठेवलेलं आहे.
झालं... मग काय आजुबाजुला बघितलं आणि काही इकडचा तिकडचा विचार न करता मी सरळ एका दूकानात घुसलो. दुकानदाराने मस्त गोड हास्य देवून माझं स्वागत केलं. तिथे टांगलेल्या काही वस्तू मी न्याहाळू लागलो. पण बऱ्याच वेळचा मी फक्त तिथे ठेवलेल्या वस्तू न्याहाळत आहे हे पाहून त्या दुकानदाराच्या हसतमुख चेहऱ्याने आता उग्र रुप धारण केलं..
" क्या चाहिए साब ?' त्याने विचारले.
तरीही मी त्याच्याकडे लक्ष देत नाही असं पाहून तो म्हणाला, " जल्दी बोलो साब ... सुबह सुबह टाईम खोटा मत करो'.
आता पाणी डोक्यावरुन जावू नये म्हणून मी तिथे टांगलेल्या एका छत्रीचा आधार घेतला.
" केवढ्याची आहे ?' मी त्या छत्रीला गोंजारत विचारले.
" दो सौ रुपए ...' तो म्हणाला.
मी आता ती छत्री हातात घेवून न्याहाळू लागलो. दुकानदार आत गेला आणि त्याच्या जागी त्याच्या नोकर येवून उभा राहाला.
मी त्या नोकराला विचारले, " यात ते वेगवेगळे रंग असतात ना?'
काही न बोलता स्वयंचलीत खेळण्यासारखा तो आत गेला आणि चार पाच वेगवेगळ्या रंगाच्या छत्र्या घेवून आला.
' पण यावर ते पांढऱ्या रंगाचं डिजाईनसुद्धा असतं नं?''
" हो असते ... पण आमच्या जवळचा तो माल संपला आहे ' नोकर म्हणाला.
मी सुटकेचा श्वास सोडला. चला इथून सटकण्याचे हे चांगले निमीत्त आहे.
दुकानातून जायला वळलो तोच आतून दुकानदाराचा आवाज आला, '' क्यों ... क्या होगया?''
मी म्हटलं, '' मला निळ्या रंगाची ... त्यावर पांढरं डिझाईन असलेली छत्री पाहिजे होती... पण तुमच्याकडे नाही वाटतं''
'' कौन बोलता है नही है ?..'' तो नोकरावर ओरडला. पण नोकर तिथे नव्हता. तो कदाचित आत गेला होता.
त्याने नोकराला आवाज दिला, " टॉमी...'
एवढ्या वेळात नोकर कुठे गेला काही कळत नव्हतं.
त्याने पुन्हा रागाने नोकराला आवाज दिला, '' कहा मर गया... टॉमी...'
गल्लीत फिरणारा एक बेवारस कुत्रा धावतच तिथे आला.
कुत्र्याला पाहून तर तो दुकानदार अजुनच भडकला.
त्याने तिथेच बाजुला बसलेल्या एका दुसऱ्या पोराला बोलावले. कदाचित तो त्याचा नविन ट्रेनी नोकर असावा.
" बगल के दूकानसे ब्लू कलरके और सफेद डिजाईनवाले चार पाच पीस लेके आ ... जल्दी' दुकानदाराने त्याला आदेश दिला. तो पोरगा हिंन्दीत थोडा कच्चा असावा. कारण त्याची प्रचीती आम्हाला थोड्याच वेळात झाली. त्याला दुकानदाराने जे काही सांगितलं ते बरोबर समजलं नसावं. पण आधीच भडकलेल्या मालकाला विचारण्याची त्याची हिम्मत झाली नाही. तो धावतच तिथून दोन-चार दुकानं सोडून पुढे गेला. त्याला तिथे एक सलूनचं दूकान दिसलं. त्याने आपली अक्कल लढवली "बगल की दूकान' म्हणजे ... बगल साफ करण्याचं सलूनचं दुकान. त्याला तशी शंकाही आली की इथे छत्र्या कशा मिळतील. पण मालकाने सांगितले म्हणजे नक्कीच मिळतील. तो आत गेला. आता त्याने सलूनवाल्याला छत्र्या मागितल्यानंतर काय झाले असेल याची कल्पना न केलेली बरी. ही सगळी हकिकत नोकराने परत येवून आपला डावा गाल चोळत जेव्हा सांगितली तेव्हा आम्हाला कळली. एवढ्यात तो आधीचा नोकर तिथे आला.
" ... कहा मर गया था कुत्ते ...' मालक ओरडला.
इतक्या वेळचा जो दुकानदाराकडे मोठ्या आशेने पाहत होता तो कुत्रा ... बिचारा पळून गेला.
" वो शर्माजीके दुकानसे ब्लू कलर के और सफेद डिजाईनवाले चार पांच पिस लेके आ ...' म्हणत दुकानदाराने त्याला पळवले. नोकर धावतच गेला. मी आता तिथून सटकण्याचा दूसरा उपाय शोधत होतो.
मी म्हटलं, ' जर वेळ लागत असेल तर राहू द्या... मी पुन्हा कधीतरी येईन... तसा पावसाळा येण्यास अजून बराच अवकाश आहे'
" टाईम कायका साब ... दो मिनट का काम है' त्याने जवळजवळ माझ्या दंडाला पकडत म्हटले. आता तर पळून जाणंही शक्य नव्हतं. तो नोकर धावतच छत्र्या घेवून आला. त्याने सगळ्या छत्र्या माझ्यासमोर टेबलवर आपटल्या. मला खात्री आहे की त्याने त्या छत्र्या आपटतांना नक्कीच त्या टेबलाला माझं डोकं समजलं असेल ... आणि त्या छत्र्याच्या बंडलाला त्या दुकानदाराचं डोकं. त्यातली एक घेवून मी विचारलं, ' ही केवढ्याची आहे'
त्याले ती छत्री आलटून पालटून पाहाली. एका जागी काहीतरी लिहिलेलं होतं. त्याच्यासोबत मीही वाचण्याचा प्रयत्न करु लागलो. तिथे 1625 असं लिहिलेलं वाचून तर माझं हृदयच धडधडायला लागलं.
" ढाईसौ रुपए..' दुकानदाराने पटकन सांगीतले.
मी पुन्हा लक्ष देवून पाहू लागलो की 250 कुठं लिहिलेलं आहे. 250 कुठंच लिहिलेलं नव्हतं. मग मी मनातल्या मनात 1625 ला 2 ने, 3 ने, 4 ने भागण्याचा प्रयत्न करु लागलो. जेवढ्या गणिताच्या प्रक्रिया मला येतात तेवढ्या मी 1625 वर करुन बघितल्या. पण कोणत्याही परिस्थितीत 250 येण्याचं नाव घेत नव्हतं. कदाचित माझंच गणित कच्च असावं. एवढ्यात दुसऱ्या एका गिऱ्हाइकामुळे त्या दुकानदाराचं माझ्यावरचं लक्ष हटल्यामुळे मी ती छत्री तिथे तशीच ठेवून सटकू लागलो. मागुन दुकानदाराचा आवाज आला, '"अब क्या हूवा?'
मी जाता जाता वळून म्हटलं, "महाग आहे '
" अरे तो आप बोलीये ना आपको कितने में चाहिये ' त्याने म्हटले.
" जावूद्या .. मला घ्यायचीच नाही ' माझ्या तोंडातून निघालं.
हे ऐकल्याबरोबर तर तो दुकानदार अजुनच भडकला. तो रागाने म्हणाला 'अरे ऐसे कैसे लेने का नही...
... इतनी देर से हमारा टाईम खाया ... और अब बोलता है लेने का नही... इस दुकान को क्या बगीचा समझ रखा है ... बैठे तो बैठे नही तो चले गए.'
मी पुन्हा स्वत:ला सावरीत म्हणालो, "पण खुप महाग आहे'
" तो तुम बोलो ना कितने मे चाहिए... देखुतो तुम्हारी हैसीयत क्या है?' तो "आप' वरुन "तुम' वर आला होता.
मी भीतभीतच आजुबाजूला बघितले. शेवटी इज्जतीचा आणि इभ्रतीचा प्रश्न होता.
मी दबक्या आवाजात म्हटले, " पंच्याहत्तरला द्या '
वेडवाकडं तोंड करीत उपरोधाने तो म्हणाला, "पचत्तर... रुपए या पैसे'
"पंच्याहत्तर रुपए' माझ्या गळ्यातून अटकलेला आवाज आला. तो रागाने सगळ्या छत्र्या जमा करायला लागला. झाला तेवढा अपमान पूरे झाला. आता तो पुढे अजून काही म्हणून आपला अपमान ना करो म्हणून मी तिथून जाण्यासाठी वळलो.
" ए रुक... जाता किधर है ... ' तो तुच्छतेने म्हणाला.
" ये ले ... सुबह सुबह बहुनीका टाईम है इसलिए... नही तो पचत्तर रुपएमें इसका डंडा भी नही आता ... वैसे भी हम सुबह आये भिखारी को भी तो खाली जाने नही देते...' असं म्हणून त्याने ती छत्री माझ्याकडे जवळ जवळ भिरकावून दिली. मी क्रिकेटरच्या चपळाईने त्या छत्रीला कॅच केलं. कॅच मीच केलं होतं आणि आऊटसुध्दा मीच झालो होतो. चूपचाप 75 रुपए आतल्या खिशातून काढून त्या दुकानदाराच्या हातावर टेकवले आणि आपल्या कपाळावरचा घाम पुसत मी त्या दुकानातून बाहेर पडलो. खरं म्हणजे घाम पुसण्यापेक्षा आपल्या चेहऱ्यावरचे भाव लपविण्याची आवश्यकता मला जास्त वाटली होती. ऍग्रेसीव मार्केटिंग कशाला म्हणतात हे मला आता चांगल्या तऱ्हेने समजले होते.
क्रमश:...
खुपच मस्त...
ReplyDeleteपुढच्या भागच्या प्रतिक्षेत...
Chhann hota. Pan ek samjla nahi, tumhi tumchya bayakobarobar "shopingla" jat hota ki "marketingla". Thod vachtana gondhal hot hota. Any way mi tari kharedila jat hota asach vachla.
ReplyDeleteYes 'mad_hu' as you pointed out correctly it should be 'Shopping' instead of marketing at places. I have duely corrected it. Thanks!
ReplyDeletekhup mast navin bhagachya pratikshet.....
ReplyDeleteGood Sense of humor .. Keep goin
ReplyDeletekhupach chan.. vahchatna bharpur hasayla aala..
ReplyDeletevery nice....
ReplyDeleteekdam chhan
ReplyDeleteoho kya story hai...........jabardast.......
ReplyDeleteBarach divsanantar khup haslo... very good.
ReplyDeleteBaracha Divsanantar Khup Haslo.. Bara Watla.. very nice... Bhagyoday Xerox Aurangabad
ReplyDelete