Novel - Mrugjal - Ch - 8
केमेस्ट्री - 2 चा क्लास चालला होता. प्रोफेसर फळ्यावर वेगवेगळ्या रिऍक्शनचे फॉर्मुले लिहित होते आणि विद्यार्थी पटापट प्रोफेसर ते पुसून टाकायच्या आत आपल्या नोट्सवर लिहून घेत होते. विजयही नोट्स घेण्यात गुंग होता. विजयच्या शेजारी बसलेला राजेशही नोट्स घेण्यात मग्न होता. प्रिया नोट्स घेता घेता मधून मधून सारखी विजयकडे वळून पाहात होती.
"" तुला या फॉर्मुल्यामधे आणि आधीच्या फॉर्मुल्यामधे काही फरक दिसतो?'' राजेशने नोट्स घेता घेता विजयला विचारले.
"" आहेना ... अर्थातच फरक आहे'' विजय म्हणाला.
"" मला तर काहीच फरक दिसत नाही आहे... खरं म्हणजे मला केमेस्ट्री - 2 चे सगळे फॉर्मुले एकसारखेच वाटतात''
"" सगळे सारखेच?'' विजय.
"" हो अगदी सगळे मुंगळ्या डोळ्याचे चायनीज एकाच रांगेत उभे राहावे असे'' राजेश म्हणाला.
विजय हसला आणि म्हणाला, "" तु पण एक एक भन्नाटच उपमा देतोस''
'' अरे माझ्या एका मित्राचे काका चायनात जेव्हा कामाला गेले होतेना... तर ते सांगत होते की त्यांना जवळ जवळ 3 महिने लागले त्या कंपनीतल्या प्रत्येकाला वेगळं वेगळं ओळखण्यासाठी '' राजेश म्हणाला.
विजय पुन्हा राजेशच्या गोष्टींकडे जास्त लक्ष न देता नोट्स घेवू लागला. आणि त्याने लक्ष न दिल्यामुळे राजेश आपोआपच चूप बसून सर काय शिकवताहेत हे समजण्याचा प्रयत्न करु लागला. तेवढ्यात नोट्स घेता घेता विजयच्या लक्षात आले उजव्या बाजुकडून आपल्याकडे कुणीतरी सारखं वळून वळून बघत आहे. यावेळी त्याने तिकडे वळून बघितले तर प्रिया वळून त्याच्याकडे पाहात होती. आहे. त्यांची नजरा नजर होताच तिने पटकन आपली नजर वळवून फळ्याकडे फिरवली.
20 मिनीटांची रिसेस होती आणि सगळे विद्यार्थी छोटे छोटे समुह करुन व्हरंड्यात उभे होते. विजय व्हरंड्यात एका खांबाला रेटून उभा होता आणि त्याच्या समोर राजेश उभा होता. विजयने पुन्हा चोरुन दुरवर प्रियाच्या गृपकडे बघितले. तिही तिच्या गृपमधे गप्पांमधे रमलेली दिसत असली तरी तिचं पुर्ण लक्ष विजयकडे होतं. तिनेही चोरुन विजयकडे बघितलं. दोघांची नजरा नजर झाली तसं विजय राजेशला म्हणाला,
"" पन्नास''
"" पन्नास? ... काय पन्नास?'' राजेशने विचारले.
विजय काही न बोलता पुन्हा प्रियाकडे चोरुन बघण्यात मग्न झाला.
'' हे तुझं ' पन्नास ' म्हणजे त्या पुलावरच्या वेड्यासारखं झालं'' राजेश.
'' कोणत्या पुलावरच्या वेड्यासारखं?'' विजयने विचारलं तर खरं पण त्याचं राजेशच्या बोलण्याकडे विषेश लक्ष नव्हतं.
'' अरे एकदा एका पुलावर एक वेडा ' पन्नास' ' पन्नास ' म्हणत उभा होता... तेथून चालण्याऱ्या एका माणसाने त्याला विचारले की काय ' पन्नास' तर त्या वेड्याने त्या माणसाला पुलावरुन खाली नदीत ढकलले आणि मग 'एक्कावन्न - एक्कावन्न' म्हणायला लागला'' राजेश जोक सांगुन जोराने हसायला लागला.
पण विजयचं त्याच्या बोलण्याकडे लक्ष नसल्यामुळे त्याच्या हसण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता.
"" राजा ... तुला एक गंम्मत सांगतो'' विजय गालातल्या गालात हसत अचानक म्हणाला.
"" गम्मत .. कसली गम्मत?'' राजेशने विचारले.
"" ते तिकडे बघ... त्या पोरींच्या गृपमधे'' विजय म्हणाला.
राजेशने वळून बघितले.
"" अबे तिकडे नाही... पोरींकडे बघ म्हटलं की सारखं तु त्या मोटीकडे काय बघतो?'' विजयने त्याल हटकले.
"" अबे मोटी नाही ती ... अंगात थोडी भरलेली आहे बस'' राजेश म्हणाला.
"" अस्स!... बरं जावूदे आधी तिकडे मागे बघ ... ती नविन पोरगी आली आहेना तिकडे'' विजय म्हणाला.
राजेश तिकडे पाहत म्हणाला, "" अच्छा ती प्रिया''
"" म्हणजे तुला तिचं नावही माहित झालं... '' विजय आश्चर्याने म्हणाला.
"" त्यात काय नविन ... सगळ्या क्लासला माहित आहे तिचं नाव... तुलाही माहित असेल पण तू दाखवत नाही एवढंच'' राजेश म्हणाला.
"" अरे नाही ... खरंच मला तिचं नाव माहित नव्हतं'' विजय म्हणाला.
"" बरं काय गम्मत आहे ते तर सांगशिल'' राजेश म्हणाला.
"" आपला पहिला तास कशाचा होता?''
"" केमेस्ट्रीचा.. का?'' राजेशने विचारले.
"" केमेस्ट्रीच्या तासापासून मोजतोय ... तिने माझ्याकडे आत्तापर्यंत बरोबर पन्नास वेळा... आणि आता बघ.. एक्कावन्न वेळा बघितलं आहे'' विजय म्हणाला.
"" अच्छा ... अच्छा तो ये बात है'' राजेश त्याला छेडण्याच्या उद्देशाने म्हणाला.
'' बरं आता मी तुला एक गंम्मत सांगतो'' आता राजेश त्याचं लक्ष वेधून घेत म्हणाला.
'' कोणती गंम्मत?'' विजयने विचारले.
"" मला एक सांग... की एक्कावन्न वेळा तिने तुझ्याकडे पाहिलं... बरं हे तुला कसं कळलं?'' राजेशने पुढे विचारले
"" अर्थातच मी स्वत: मोजलं आहे? '' विजय म्हणाला
"" तु मोजलं... म्हणजे तुही तितकेच वेळा किंबहुना जास्त वेळा तिच्याकडे पाहालं तेव्हाच तुला हे कळलंना? '' राजेश त्याला कोड्यात पकडीत म्हणाला.
"" हो... म्हणजे तसं नाही... '' विजय गोंधळून म्हणाला.
"" म्हणजे तिही तुझ्यावर आरोप करु शकते की तु तिच्याकडे एक्कावन्न वेळा पाहालं '' राजेश मुद्द्यावर येत म्हणाला.
विजय गप्पच झाला होता. त्याला काय बोलावे काही सुचेना.
"" तु माझी बाजु घेतो आहे का तिची '' आता विजय चिडून म्हणाला.
"" मी कुणाचीच बाजू घेत नाही आहे, फक्त जी वस्तूस्थिती आहे ती सांगत आहे.'' राजेश खांदे उडवून म्हणाला.
'' म्हणजे?'' विजय.
'' म्हणजे हे की बच्चू.... तुला सगळ्या गोष्टी गणिती भाषेत मोजायची सवय झालेली आहे... पण लक्षात ठेव जिवनात काही गोष्टी अश्या असतात की त्या गणिती भाषेत बसत नाहीत'' राजेश त्याला काही तरी गर्भीतार्थ समजावून सांगावा असं म्हणाला.
'' मला कळतय तुला काय म्हणायचं ते'' विजय.
'' काय कळलं तुला?'' राजेश.
'' नाही म्हटलं... की हा त्या मोटीच्या गणीती भाषेतल्या वजनाकडे दुर्लक्ष करण्याचा चांगला बहाना आहे '' विजय.
'' तू येवून जावून तिच्यावर का येतोस यार'' राजेश चिडून म्हणाला.
'' ओ ... सॉरी ... सॉरी..'' विजय
क्रमश: ...
saglya post ekdam dya cantrol hot nahi vachayala
ReplyDeletejara patapat story cover kara na sagly ekdam vachnyachi khup ghai aahe
ReplyDeleteAre yar ,plz post it fastly.again u r cheking our patience,plz post complete novel,
ReplyDeletenice story i like it
ReplyDelete