Marathi Novel - Mrugjal - CH- 1 रिसेप्शन
आज राजेशच्या लग्नाच्या रिशेप्शनची ( reception ) गडबड चाललेली होती. राजेशने लग्नाच्या रिसेप्शनसाठी एकदम गावात गर्दीच्या ठिकाणीही नाही आणि गावाच्या बाहेर जास्त दुरही नाही असा हिरवळीने वेढलेला लॉन ( Lawn ) निवडला होता. रिसेप्शनच्या निमित्ताने राजेशचे जवळपास सगळे जुने, कॉलेजचे मित्र आवर्जुन जमले होते. आणि ते सगळे एक घोळका करुन गप्पा मारीत होते. तेवढाच जुण्या आठवणीना उजाळा. तेवढ्यात प्रिया गेटमधून आत येतांना त्यांना दिसली. सगळा घोळका एकदम शांत झाला. तेव्हाची प्रिया आणि आजची प्रिया यात जमीन अस्मानचा फरक दिसत होता. तेव्हा ती एक कॉलजमधे जाणारी नुकतीच यौवनात प्रवेश केलेली एक विद्यार्थीनी होती आणि आज ती अगदी परीपुर्ण यौवनाने भरलेली एक युवती दिसत होती. कदाचित येवढं नटून थटून त्यांनी तिला कधी बघितलं नसल्यानेही हा फरक जाणवत असावा. सगळ्या घोळक्याच्या नजरा तिच्यावर खिळलेल्या होत्या. तिने मंद हास्य देत सगळ्या घोळक्यावर एक नजर फिरवली. त्या घोळक्यानेही तिचे मंद हास्य स्विकारत हसून जणू तिचे हास्य स्विकारले.
घोळक्याजवळ जाताच प्रथम तिने पुष्पगुच्छ देवून राजेशला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या ,
'' कॉग्रेचुलेशन्स अन्ड विश यू अ हॆपी ऍन्ड प्रास्परस मॅरीड लाईफ''
'' हॅपी पेक्षा प्रॉस्परस महत्वाचं बरकां...'' कुणी तरी कमेंट पास केलं आणि इतका वेळ एकदम शांत झालेल्या घोळक्यात जणू पुन्हा संजीवनी संचारली होती.
राजेशनेही त्याच्या बायकोची ओळख प्रियाला करुन दिली.
'' प्रिया... ही कमल ... माझी बायको''
'' ते सांगायची गरज नाही ... ते दिसतच आहे... फक्त नाव सांगितलं तरी पुरे'' प्रिया गमतीने म्हणाली.
तिच्या या गमतीवर घोळक्यातले सगळे जण हसले.
'' अगं नाही प्रिया ... तेही फार महत्वाचे आहे... एकदा काय झालं माझ्या एका मित्राच्या लग्नाच्या रिसेप्शनला त्याची बायको आणि साळी पुर्ण प्रोग्रामभर ( Program ) मिरवत होते... आणि माझ्या मित्राने कुणाला त्याच्या बायकोची ओळख करुन देण्याची तसदी घेतली नाही... आणि काय झालं... पुर्ण प्रोग्रॅमभर आम्ही त्याच्या साळीलाच त्याची बायको समजत होतो...''
पुन्हा सगळेजण हसले.
'' कुण्या मित्राचं नाव घेवून हा स्वत:च्या रिसेप्शनची तर गंमत सांगत नाहीना'' कुणीतरी कमेंट पास केली आणि पुन्हा हसण्याचा गडगडाट झाला.
'' ही माझी मित्र प्रिया... मी ही आणि विजय... आमचा मस्त गृप ( group ) होता'' राजेशने आपल्या बायकोला प्रियाची ओळख करुन दिली.
'' बघा हा काही गैरसमज होवू नये म्हणून किती चतूरतेने विजयचंही नाव मधे घालतो आहे ... '' अजुन कुणीतरी कमेंट पास केली.
पुन्हा हास्याची एक फेरी झाली.
राजेशची बायको कमलचं तोंड पडलेलं पाहून त्याच मित्राने स्पष्टीकरण दिलं, '' तसं काही नाही बरं का वहिणी... मी आपली उगीच गंमत केली... ''
"" पण प्रिया आणि विजयच्या बाबतीत मात्र मी काही शाश्वती देवू शकत नाही...'' तोच मित्र पुढे म्हणाला तशी प्रिया लाजली.
'' बघ बघ... विजयचं नाव घेतल्याबरोबर तिच्या गालावर कशी लाली आली'' दुसरा एक मित्र म्हणाला.
प्रिया अजुनच लाजत होती. तिला काय बोलावे काही सुचत नव्हते.
'' विजय कसा नाही आला अजून?'' राजेशनेच पुढाकार घेवून विषय बदलण्याचा प्रयत्न केला.
"" अरे येईल... तु निमंत्रण दिलं ना... का बायकोच्या नादात त्याला निमंत्रण ( invitation ) द्यायचंच विसरला'' अजुन कुणीतरी बोलला.
'' अरे नाही... हि इज माय बेस्ट फ्रेंड ( He is my best friend ) ... असं कधी होईल का?'' राजेश
थोडा वेळ शांततेत गेला.
'' कारे हनीमुन ( Honeymoon ) वैगेरेचा काही प्लान ( Plan ) केला की नाही'' एका मित्राने राजेशला छेडण्याच्या उद्देशाने आपल्या गोष्टींचा मोर्चा दुसऱ्याच दिशेने वळविला.
'' हो केलाना?'' राजेश आपली बायको कमलकडे अर्थपुर्ण नजरेने पाहत म्हणाला.
कमलने लाजून मान खाली घातली.
'' कुठला केलास प्लान?'' तो मित्र राजेशला काही सोडण्याच्या मुडमधे दिसत नव्हता.
'' सिमला ( Simla ) '' राजेश.
'' देशातच?... मला वाटलं देशाबाहेर जाशील...'' मित्र
'' देशाबाहेर जायला वेळ लागतो बाबा... त्याच्याजवळ तेवढा धीर तर हवा'' दुसरा मित्र.
गोष्टींना जरा वात्रट वळण लागत आहे हे पाहून कुणीतरी ओळखीचं दिसल्यासारखं करुन ' एक्स्कुज मी ( Execuse me ) ' म्हणत प्रिया तिथून दुसऱ्या घोळक्याकडे गेली.
क्रमश:.
mi khup utsuk aahe ya kahani sathi surwat tar chan aahe aata pudhe
ReplyDeleteThik ahi surwat !!
ReplyDeletesurwat tar Khupch chhan ahe
ReplyDeletekhup ustukata ahe pude kay honar
ReplyDeleteSurvat khupach chan ahe ata lavkarat lavkar pudhche chapters liha karan khupach utsutkta ahe pudhe vachnyasathi.
ReplyDeleteSadhya vakyani aakrshak suravat!!!!
ReplyDeletetumchi bhasha mala kupch sadhi vatli ajun chan shabdh vaparu sakal..
ReplyDeletekhup interesting
ReplyDeletelai bhari surwat zali..........
ReplyDeletesurwat khupa mast ahe. ani pudhe vachaychi iccha ahe.
ReplyDeletesuruwt khupach awadali. Phude wachayach ahe. but i came late on this
ReplyDeletesurwat tar khup chan keli ahe, mitranchi atvan zali
ReplyDeletechan survat
ReplyDeletekhup chaan
ReplyDeletenice
ReplyDeleteaare kuph chan story aahai me kuph utsuk aahai fude vachna sathi
ReplyDeletenic story mala puthe vajhnychi utsuktha aahai
ReplyDeletevery nice........... i m intrested in next chapter.......
ReplyDeletechhan
ReplyDeletenavin kadambari kadhi suru honar mi vat pahate
ReplyDeletegreat.....
ReplyDeleteIts really good as one ................4 the young and cute generation..................pratekane vachanya sarkhe aahe
ReplyDeletekhupach chhan......very intrested....
ReplyDeleteasahi aayushy kunachya vatela yet ka?????
ReplyDeleteSuruvat khup Chan ahe pudhe pahu ............
ReplyDeleteMast ekadam zakkas ahe.
ReplyDelete1no
ReplyDeletelai mast aahe...purna vachavi shi vattay mala...aprateem!
ReplyDeletebarbed wire
very nice
ReplyDeletekharach khup chhan aahe he..........
ReplyDeletePlease post a Hindi version of the novel. Name sounds really intrusting. But not able to read it in Marathi. So Hindi Pleeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeease...
ReplyDeleteसुरवात खूप छान आहे
ReplyDeleteso nic
ReplyDeleteमराठी विनोदांच्या पेजवरून आपल्या नॉवेल्सची ओळख झाली. लिखाण लक्षवेधी आहे. Gripping! उरलेले chapters वाचून काढण्याचा मानस आहे. अभिनंदन.
ReplyDeleteAatur aahe vachayla let see...............
ReplyDeleteSundar lekhan
ReplyDeleteSundae lekhan interesting story
ReplyDeletekhup chan suruwat. utsukta vadhate ahe pudhe kay honar. colg chya freindgroup chi aathavan jhali
ReplyDelete