Marathi web of Novel books - Madhurani - CH-7 सरपंच
वाचा काही निवडक प्रतिक्रिया - प्रतिक्रिया
ते दोघे सरपंचाचा घराजवळ येऊन पोहोचले. घर कसलं वाडा होता तो वाडा! वाडयाला समोर जुना तेल देऊन देऊन काळा झालेला भला मोठा दरवाजा होता. वाडयाचा घेरही खूप मोठा होता; समोरून तरी तसंच जाणवत होतं. वाडयाच्या डाव्या बाजूला, वाडयाला लागूनच शेजारी सरपंचाचा भला मोठा जनावरांचा गोठा होता. आता सध्या तो रिकामाच दिसत होता. कदाचित सरपंचाची गुरं सकाळीच चरायला रानात निघून गेली असावीत. वाडयाच्या मोठया दरवाजातून गणेशला आत नेत सदाने त्याला उजवीकडे असलेल्या बैठकीत बसवीले. बैठक म्हणजे थोडी उंच असलेली खोली होती आणि त्यात गादया लोड इत्यादि टाकलेले होते. गणेश बैठकीत इकडेतिकडे बघतच आत शिरला. तिकडे सदा आत गेला, कदाचित सरपंचांना बोलावण्यासाठी. बैठकीत भिंतीवर वेगवेगळया तसबिरी लावलेल्या होत्या - नेहरु, लाल बहादूर शास्त्री, महात्मा गांधी, इत्यादि. गणेश त्या तसबीरींकडे बघत एका जागी गादीवर बसला. भिंतीवर त्याचे लक्ष एका भारदस्त लांब लांब मिशा आणि डोक्याला उंची पटका बांधलेल्या एका माणसाच्या तसबीरीने वेधून घेतले. कदाचित ते सरपंचाचे वडील असावेत किंवा वडिलाचे वडिल असावेत. तेवढयात सदा आतून एका बादलीत पाणी घेऊन आला. " या सायेब हातपाय धून घ्या ... इतक्या लांबून आले शिणला असान. " बादली घेऊन सदा समोर ओटयावर जात म्हणाला.
" हो... " म्हणत गणेश उठला आणि समोर ओटयावर गेला.
लोटयाने बादलीतील पाणी घेऊन गणेशने हातपाय तोंड धूवून चूळ भरली. चूळ थोडावेळ तोंडात फिरवून तो आता ती थुंकण्यासाठी इकडे तिकडे बघत जागा शोधू लागला.
" थूकाकी तेथंच समोर... "
त्याने ती अवघडल्यासारखी समोरच पण थोडी बाजूला थूंकली. सदा गालातल्या गालात हसला.
" सरपंच पुजापाठ करतेत... दोन घडीत येतील ते ... आता तुमी बसा गुमान बैठकीत... मी च्यापाण्याचं बगतो " गणेशजवळ हातपाय पुसण्यासाठी एक कापड देत सदा म्हणाला.
गणेश हातपाय तोंड पुसायला लागला आणि सदा लगबगीनं आत गेला.
गणेशला आता हातपाय धूतल्यानंतर तरतरी जाणवायला लागली होती. बसमध्ये घामाने आणि धुळीने चेहरा सगळा म्लान झाला होता. चेहरा पुसत पुसत तो लोडवर पाय लांब करून टेकून बसला. बसमध्ये पाय एका ठरावीक जागेत ठेवून अकडून गेले होते. कपडा बाजूला ठेवत हातपाय ताणत त्याने आळस दिला. तेवढयात सदा प्यायला पाणी घेऊन आला. येथील पाणी देण्याची तऱ्हा जरा वेगळीच दिसत होती. सदाने पाण्याने भरलेला पितळीचा लोटा गणेशच्या हातात दिला. लोटयावर पितळीचीच एक वाटी ठेवलेली होती. ही अशी तऱ्हा त्याने तिकडे बारामतीकडे बघितली होती. जेवढं लागते तेवढं वाटीत पाणी ओतून घ्यायचं आणि मग पूर्ववत वाटी लोटयावर झाकून ठेवायची. न जाणो का? पण त्याला ती तऱ्हा पूर्वी पाहिली होती तेव्हासुध्दा आवडली नव्हती. त्याच्या मनात एक अढी होती की जर वाटीने पाणी पिऊन वाटी पुन्हा लोटयावर ठेवल्यास वाटीचे उष्टे पाण्याचे थेंब लोटयात घळंगणार नाहीत का? पण हा झाला त्याचा विचार तिकडे बारामतीकडे तर सर्व मोठमोठे लोक याच तऱ्हेने पाणी पीत होते. तशी त्याला तहानही भरपूर लागली होती. सकाळी उजाडायच्या आत निघाल्यापासून आतापर्यंत पाण्याचा एकही थेंब त्याच्या पोटात गेला नव्हता. तो तोंडाच्या वर लोटा तिरका करून वरून घटाघट पाण्याचे घोट पीऊ लागला. लोटा रिकामा झाल्यावरच त्याने तो खाली ठेवला आणि एक दीर्घ श्वास घेतला.
" लई तहान लागलेली दिसते ... आणू का आजून " सदाने विचारले.
गणेशने मान हलवूनच 'नाही' असे म्हटले.
सरपंच पुजा आटोपून शांतपणे बैठकीत आले. पांढरं शुभ्र धोतर आणि वर कापडाच शिवलेलं पांढरं शुभ्र बनेन. कपाळाला लाल गंधाचा उभा टीका कोरलेला. पुजेच्या आधी नुकतीच अंघोळ केल्यामुळे त्यांचे तेल लावलेले ओले काळे पांढरे केस आणि चेहरा चमकत होता. एकूणच मुर्ती जरी वयस्कर असली तरी सात्विक वाटत होती. तशी गणेशची आणि सरपंचाची तालूक्याच्या ठिकाणी ओळख झाली होतीच. सरपंच येताच पहुडलेला गणेश सरळ होऊन बसला.
" नमस्कार ... गणेशराव "
" नमस्कार ... "
सरपंच गणेशच्या शेजारीच एका लोडला टेकून बसले.
गणेशच्या पाठीवर हलक्या हाताची थाप मारीत सरपंच म्हणाले " काय मंग... तरास वैगेरे झाला नाय ना "
गणेश गोंधळात पडला. हो म्हणावं की नाही त्याला काही कळेना.
त्याची विवंचना पाहून सरपंच म्हणाले " सुरवातीला ... तरास होईलच ...इतक्या दूर तेबी खेडयावर अन् वर कच्च्या रस्त्याने एस्टीने यायचं म्हटलं तर तरास होणारच ... पण होईल सय हळू हळू "
सरपंचाची एखाद दुसरा शब्द सोडला तर बाकी खेडूतांपेक्षा भाषा शुध्द वाटत होती.
तेवढयात सदा चहा घेऊन बैठकीत आला.
" अरे नुसता चहाच ... काही न्याहारीचंबी घेऊन ये की "
सदाने चहाच्या दोन कपबश्या दोन हातात धरून आणल्या होत्या. सरपंचाची फराळाची सुचना ऐकून तो दरवाज्यातच घूटमळला.
" नाही... सरपंचजी... मी येतांनाच फराळ करून आलो... मला सकाळी उठल्या उठल्याच फराळ करायची सवय आहे ... "
" नाय असं कसं ... तुमी आमच्याइथं पहिल्यांदाच येताय अन् बिना खान्याच जाता ... "
" नाही सरपंचजी ... खरंच नको.... "
" बरं बरं ... पण सदा यांच्या दुपारच्या अन् रातच्या जेवणाची व्यवस्था करायला सांगा आत "
सदाने हसत हसत मान हलविली आणि चहा घेऊन तो गणेश आणि सरपंचाच्या समोर येऊन उभा राहिला. चहाच्या कपबश्या त्यांच्या हातात देऊन तो लगबगीने परत आत गेला.
" फारच सज्जन माणूस दिसतो... " गणेशने चहा घेता घेता सदा ज्या दिशेने गेला तिकडे आपला रोख करीत म्हटले.
सरपंचसुध्दा चहा पीत होते. त्यांना चहा पीता पीता एकदम ठसका लागला.
त्यांनी गणेशकडे चमकून पाहत विचारले " तुमाला हा घेऊन आला का इथें ?"
" हो "
" अरे ... देवा ... " कपाळावर हात मारीत ते म्हणाले.
" काय झालं? "
" काय नाय "
त्यावर सरपंचानी काहीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही आणि ते चहाचा घोट घेऊ लागले हे पाहून तो पुढे म्हणाला,
" अहो त्याने माझी ओळख नसतांना बसस्टॉपवरून माझी बॅग उचलून इथपर्यंत आणली ... आणि रस्त्याने गप्पा करून माझी करमणूकसुध्दा केली.... खरोखर असे सज्जन आणि निस्वार्थी लोक फक्त खेडयातच मिळू शकतात... आणि तेही बोटावर मोजण्याएवढेच असतील... "
" सज्जन? ... कोण सदा ? " सरपंचाने आश्चर्याने म्हटले.
गणेश सरपंच पुढे सदाबद्दल काय सांगतात याची वाट पाहू लागला. पण सरपंच तेवढं बोलून गप बसले.
" का काय झालं? ... मला तरी फार सज्जन माणूस वाटला बघा तो "
" काही नाय ... तुमाला कळलच .. .हळूहळू... " एवढं बोलून सरपंचाने विषय बदलला.
" आता दिसभर काय करायचा विचार हाय ... नाय म्हणजे विश्रांती घेऊन कामाला सुरवात करता की लागलीच ... "
सरपंचाने सदाचा विषय बदलल्याचे गणेशच्या लक्षात आले. पण त्यालाही आतातरी तो विषय लावून धरून खोदून खोदून विचारने योग्य वाटले नाही.
जवळपास तीनचार तासाच्या प्रवासाने गणेश शिणला होता. त्याला आतातरी लागलीच कामाला सुरवात करण्याचा उत्साह वाटत नव्हता. गणेश विवंचनेत पडला.
काय कराव...
ताबडतोब कामाला सुरवात करावी...
की थोडा आराम करावा आणि मग....
मनकवडया सरपंचाने त्यांच्या मनातला विचार ओळखला.
" ठिक हाय असं करा ... आता जरा आंग टाका... थोडया वेळानं जेवण तयार होईल ... आपण जेवण बिवन करू अन् मंग लागू कामाला.. "
" हो तसंच करू या... " गणेश अवघडल्यासारखे पाय ताणत म्हणाला.
" तुमी आता निवांत पडा ... अगदी हातपाय लांब करून ... मी सदाला दरवाजा ओढून घ्यायला सांगतो... "
असं म्हणत सरपंच बैठकीबाहेर पडले.
क्रमश:
Courage is not the absence of fear, but rather the judgement that something else is more important than fear.
mbrose Redmoon
hello sir,
ReplyDeletefarach sundar aahe ataparyantacha hya novel cha pravas ata pudhil prakarnachi wat pahate aahe
Thank you
arach sundar aahe
ReplyDeletesundar aahe novel
ReplyDeletesundar aahe novel
ReplyDeleteprathamach sarpanch ch7 pasun wachanyas suruwat keli, kadachit me swatah gramin bhagatun aalo asalyamule asel! pahuya yapudhil pravas kiti diwas tumachya sobat asel? farach uttam
ReplyDeletenovel khupch chan aahe, dolya samor sarv chitrit hot jat, pudhe wachaychi odh nirman hote!
ReplyDeletemarathi naav aslyamule jivantpana watat aahe baki kadambari khup sunder
ReplyDeletesadacha topic kharach kay asel yabaddal far curious zale aahe.
ReplyDeletepan te sarpanch sada baddal as ka mhanale khup usukta lagli ahe.
ReplyDeletechan ya kadambarit usukta pan ahe.....
,kupch cchan ahe novel
ReplyDelete