Marathi books - Novel Elove : CH-6 : त्या मेलचं काय झालं?

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

e-लव्ह

The Romantic, suspense, online Marathi Novel registered with FWA.

वाचा काही निवडक प्रतिक्रिया - प्रतिक्रिया

 Read Novel -  ई लव्ह  -  on Google Play Books Store





Email this Novel to your friends using following controls!
Bookmark and Share
SocialTwist Tell-a-Friend




Marathi books - Novel Elove : CH-6 : त्या मेलचं काय झालं?

Indian proverb

With efforts we can get oil out of sand.

-- Anonymous


सकाळी सकाळी रस्त्यावर लगबगीने हातात बॅग घेवून चालत विवेकची कुठेतरी जाण्याची गडबड दिसत होती.

मागुन धावत येवून त्याचा मित्र जॉनीने त्याला जोरात आवाज दिला, '' ए सुन गुरु... इतनी सुबह सुबह कहां जा रहा है''

विवेकने वळून बघितले आणि पुन्हा पुर्ववत तो लगबगीने समोर चालू लागला.

'' कुण्या पोरीबरोबर पळून बिळून तर जात नाहीस...'' जॉनीने तो थांबत नाही आहे आणि त्याची गडबड पाहून विचारले.

जॉनी अजूनही त्याच्या मागून धावत धावत त्याच्या जवळ येवून पोहोचण्याचा प्रयत्न करीत होता.

'' काय कटकट आहे... जरा दोन दिवस बाहेर चाललो आहे... त्याचाही एवढा गाजावाजा...'' विवेक बडबड करीत समोर चालत होता.

'' दोन दिवस गावला चाललो आहे... तेवढीच तुझ्यापासून सुटका'' विवेक चालता चालता जॉनीला मोठ्याने म्हणाला.

'' थोडा थांब तर खरं ... तुला एक अर्जंट गोष्ट विचारायची होती...'' जॉनी म्हणाला.

विवेक थांबला आणि जॉनी धावत येवून त्याच्याजवळ पोहोचला.

'' बोल ... काय विचारायचे? ... लवकर विचार ... माझी बस सुटेल'' विवेक त्रासल्या चेहऱ्याने म्हणाला.

'' काय झालं मग काल?'' जॉनीने विचारले.

'' कशाचं?'' विवेकने प्रतिप्रश्न केला.

'' तेच त्या मेलचं? ... काल मेल पाठवली की नाहीस? '' जॉनीने त्याला छेडल्यागत त्याच्या गळ्याभोवती खांद्यावर हात ठेवीत विचारले.

'' काय विचित्र माणूस आहेस तू... कोणत्या वेळी कशाचं काय महत्व याचा काही ताळमेळ नसतो तुला ... तिकडे माझी बस लेट होत आहे आणि तुला त्या मेलची पडली आहे...'' विवेक त्रासिकपणे त्याचा आपल्या खांद्यावर ठेवलेला हात झटकत म्हणाला.

विवेक आता पुन्हा लगबगीने पुढे चालू लागला.

'' काय गोष्ट करतो यार तू?... बसपेक्षा मेल केव्हाही महत्वाची ... आता मला सांग हावडा मेल, राजधानी मेल.... ह्या मेल मोठ्या की तुझी ती टपरी बस?'' जॉनी अजूनही त्याच्या मागे मागे जात त्याला छेडीत होता.

विवेकला कळले होते की आता या जॉनीशी वाद घालण्यात किंवा त्याच्याशी बोलण्यात काहीही अर्थ नव्हता. तो समोर मुकाट्याने लांब लांब पावले टाकीत जोरात चालू लागला. आणि जॉनीही बडबड करीत आणि खट्याळपणे गालातल्या गालात हसत त्याच्या मागे मागे त्याला छेडत चालू लागला.


क्रमश:...


Indian proverb

With efforts we can get oil out of sand.

-- Anonymous


marathi cinema, marathi books, marathi movies, marathi sahitya parishad, marathi poems, marathi kavita, marathi charolya, marathi entertainment. marathi fun, marathi videos, marathi editor font

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

No comments:

Post a Comment