Marathi Books - Black Hole CH-37 पाठलाग

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

Thoughts about life -

The secret of life is honesty and fair dealing. If you can fake that, you've got it made.

---- Groucho Marx (1890-1977)


स्टेला तडक घराच्या बाहेर पडली आणि कारमध्ये बसून तिने कारचं दार जोरात ओढून बंद केलं आणि कार सुरु केली . सुझान घराच्या उघड्या दरवाजात उभी राहून आश्चर्याने तिच्याकडे पाहत होती.

'' स्टेला..'' सुझानने आवाज दिला.

पण एकतर स्टेलाला ऐकू आलं नसावं किंवा ती ऐकण्याच्या मनस्थितीत नसावी. तिने कार फाटकाच्या बाहेर काढून वेगात रस्त्यावर दौडवली. सुझान हा सगळा काय प्रकार चालू आहे हे समजून घेण्याच्या आधीच स्टेला गेलीही होती. सुझानने दरवाजात उभं राहून थोडावेळ विचार केला आणि ती काहीतरी निश्कर्षाप्रत येवून काहीतरी निर्णय घेवून घरात परतली.

घरात येताच सुझानने कोपऱ्यात ठेवलेल्या फोनचा ताबा घेतला. ती रिसीव्हर कानाला लावून एक फोन नंबर डायल करायला लागली. तेवढ्यात आतून डॅनियल तिथे आला.

'' काय झालं हनी?'' डॅनियलने तिचा उखडलेला चेहरा पाहून विचारले.

तिने त्याला काहीच उत्तर दिले नाही. सुझानचा फोन लागला असावा कारण ती माऊथपीसमध्ये बोलली,

"' मी मि. ब्रॅटशी बोलू शकते का?''

'' हनी ... मला काही कळू शकेल?... की या घरात काय चालले आहे... सगळेजण कसे विचित्रपणे वागताहेत..'' डॅनियल ती त्याच्याशी काहीच बोलत नाही आहे हे पाहून चिडून म्हणाला.

सुझानने त्याला खुणेनेच शांत राहण्यास सांगितले.

पोलिस स्टेशनमधे फोनची सारखी बेल वाजत होती. बऱ्याच वेळ बेल वाजल्यानंतर एक सुस्तावलेला पोलिस कर्मचारी तिथे आला आणि त्याने फोन उचलला, '' हॅलो''

थोड्यावेळ फोनवर तिकडच्या व्यक्तीशी बोलल्यानंतर त्याने फोन तसाच उघडा टेबलवर ठेवून तो कुणाला तरी बोलविण्यास आत गेला.

बऱ्याच वेळाने ब्रॅट आपल्या संथ चालीने तिथे आला आणि त्याने फोन उचलला, '' हॅलो''

फोन कुणाचा आहे माहित होताच जणू ब्रॅटच्या अंगात शक्ती संचारली होती. तिकडून सुझान बोलत होती. त्याने आधी एकदा दोनदा सुझानला तिच्या भावाच्या नाहीसं होण्याच्या केसच्या संदर्भात काही महत्वाचा दूवा मिळाल्यास त्याला फोन करण्याचे सांगितले होते. बराच वेळ ब्रॅटचं सुझानसोबत फोनवर बोलणं सुरु होतं.

ब्रॅटने जेव्हा सुझानचा फोन खाली ठेवला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक कुत्सीत हास्य चमकत होतं. आणि त्याची सगळी सुस्ती जावून त्याच्या अंगात चैतन्य संचारलं होतं. ब्रॅटने ताबडतोब वायरलेस फोनचा ताबा घेत पॅट्रोलींग करणाऱ्या शहरातल्या सर्व पोलिसांना संपर्क साधला. त्याला खात्री होती स्टेला अजूनही शहराच्या बाहेर पडली नसावी. त्याने वायरलेसवर पॅट्रोलींग करणाऱ्यांना स्टेलाचे आणि तिच्या गाडीचे वर्णन सांगुन तशी कार आणि ती कुठे आढळल्यास ताबडतोब त्याला फोन करण्याच्या सुचना दिल्या.

ब्रॅटला जास्त वाट पहावी लागली नाही. थोड्याच वेळाने एका पॅट्रोलींग करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचा त्याला फोन आला,

'' सर तुम्ही सांगितलेल्या वर्णनाची गाडी आणि स्री आम्हाला आढळलेली आहे''

'' गुड... त्या कारचा पाठलाग करा आणि मला त्याबाबतीत माहिती देत रहा'' ब्रॅटने सुचना दिली.

'' यस .. सर '' तिकडून उत्तर आले.

पुन्हा ब्रॅटने त्या पोलिस स्टाफला काही सुचना देवून प्रकरणाच्या गंभिरतेची जाणीव करुन दिली.

ब्रॅट सुचना देत होता आणि तिकडचा पोलिस स्टाफ अदबीने मधे मधे म्हणत होता -

'' यस ... सर ''

'' राईट ... सर''

'' ओके ... सर''

शेवटी सगळ्या सुचना देवून झाल्यानंतर ब्रॅटने फोन ठेवून दिला आणि ताबडतोब आपलं सामान घेवून तो घाईघाईने दरवाजाच्या बाहेर पडला.


क्रमश:


Thoughts about life -

The secret of life is honesty and fair dealing. If you can fake that, you've got it made.

---- Groucho Marx (1890-1977)


Marathi kadambari, Marathi books, Marathi sahitya, Marathi literature, Marathi novel, Marathi art, Marath kala, Marathi kalamanch, Marathi natya, Marathi Natak, Marathi play, Marathi stage artists

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

No comments:

Post a Comment