Marathi Entertainment - Novel - Black Hole CH-28 धोका

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

Quote of the day -

Don't go around saying the world owes you a living; the world owes you nothing; it was here first.

--- Mark Twain [Samuel Langhornne Clemens] (1835-1910)


स्टेला पुन्हा 'C2' विहिरीकडे जावू लागली, जिथे तिने त्या विहिरीच्या काठावर काही कापडाचे धागे लागलेले पाहिले होते. 'C2' विहिरीच्या शेजारी येताच ती वाकून त्या धाग्यांकडे काळजीपूर्वक निरखून पाहू लागली.

कापडाचे धागे...

गिब्सनच्या कपड्याचे तर नसावेत?...

एक विचार तिच्या मनात डोकावून गेला. काही क्षण तिने विचार केला आणि मग तिच्या मनात काय आले कुणास ठावूक. ती त्या विहिरीच्या काठावरुन एकदम उठून उभी राहाली आणि दोन पावलं मागे सरुन तिने त्या विहिरीत उडी मारली.

स्टेला 'D' लेव्हलच्या एका खडकाळ गुहेत जमिनीवर खाली पडली होती. उठून उभं राहता राहता भितीने तिच्या अंगावर एकदम काटे आल्यागत झालं कारण तिला तिथे कुणी प्राणी काही चावत असल्याचा आवाज येत होता.

तोच तो हिंस्त्र पशू असावा ...

ज्याने त्या माणसाचा शव कुरतडून खाल्ला असावा...

एक भितीची लहर तिच्या सर्वांगात पसरली होती. तिने परिस्थीतीचा आढावा घेण्यासाठी तिथे बसूनच टॉर्चच्या प्रकाशात चहूकडे एक नजर फिरवली. टॉर्च सुरु करताच तो आवाज थांबला. ती आता उठून उभी राहाली आणि हळू हळू तिथे जवळच असलेल्या एका दुसऱ्या विहिरीकडे जावू लागली. तो काहीतरी खाण्याचा आवाज आता पुन्हा यायला लागला, यावेळी सोबतच हाडं चावण्याचा आणि तोडण्याचा आवाजही येत होता. तिच्या चेहऱ्यावर आता भिती स्पष्ट दिसू लागली होती. तिने तिच्या टॉर्चचा प्रकाशझोत त्या गुहेत चौफेर फिरवला. एका जागी जमिनीवर पांढरं काहीतरी पडलेलं तिला दिसलं. ती हळू हळू सावकाश आणि सतर्कतेने तिकडे चालू लागली. तिने ते पांढरं उचलून बघितलं तर तो एक कापडाचा तूकडा होता. आणि त्या कापडावर लाल रक्ताचे डाग होते. तिचं शरीर आता भितीने थंड पडू लागलं होतं. त्यातल्या त्यात तिला बरं वाटत होतं की ते कापडं गिब्सनचं नव्हतं. पण गिब्सनचं असंच रक्ताने माखलेलं कापडं दुसरीकडे कुठेतरी, किंवा दुसऱ्या गुहेत कुठेतर पडलेलं असू शकतं. ही शक्यताही नाकरता येत नव्हती.

तिने तिच्या समोर असलेल्या एका विहिरीच्या काठावर आपल्या जवळच्या टॉर्चचा प्रकाशझोत टाकला. त्या विहिरीच्या काठावरही तसाच एक कापडाचा तुकडा अटकलेला तिला आढळला. ती त्या विहिरीच्या काठाजवळ गेली आणि जवळून तो कापडाचा तूकडा निरखून पाहू लागली. अर्धा कापडाचा तुकडा विहिरीच्या बाहेर होता तर अर्धा विहिरीच्या आत लटकत होता. तिने तो तुकडा ओढून आपल्या हातात घेतला आणि आपल्या जवळ असलेल्या रक्ताचे डाग असलेल्या तूकड्यासोबत पडताळून पाहाला. ते दोन्हीही एकाच कपड्याचे तूकडे होते. त्या कपड्याच्या तुकड्यामुळे त्या ब्लॅकहोलमध्ये काय आहे हे पाहण्याची तिची उत्सुकता चाळवली होती. मागचा पुढचा विचार न करता ती विहिरीच्या काठावर गेली आणि आत उडी मारण्याचा विचार करीत वाकून डोकावून पाहू लागली. त्या विहिरीच्या शेजारीही एक खडक होता आणि त्या खडकावर 'D3' असं कोरलेलं होतं. आणि त्याच्या अगदी खाली लाल अक्षरांनी 'धोका' असं लिहिलेलं होतं. पण स्टेलाचं कुठे तिकडे लक्ष होतं.

तिच्या अगदी मागेच एका खडकाच्या मागून अंधारात दोन चमकणारे पिवळे डोळे तिच्याकडे रोखून पाहत होते. ते त्याच हिंस्त्र पशूचे असावेत. पण स्टेलाचं तिकडेही बिलकुल लक्ष नव्हतं.

स्टेला आता 'D3' ब्लॅकहोलमध्ये उडी मारण्यासाठी दोन पावलं मागे सरली आणि उडी मारणार इतक्यात तिच्या मागुन काहीतरी तिच्यावर झेपावलं आणि त्याने तिला घट्ट पकडून मागे खेचलं. स्टेलाची भितीदायक किंकाळी साऱ्या गुहेत घुमली. जेव्हा स्टेलाने मागे वळून बघितलं, तो जाकोब होता. त्याने तिला त्या ब्लॅकहोलमध्ये उडी टाकण्यापासून परावृत करण्यासाठी मागून पकडून मागे खेचले होते. आता ते दोघंही जमिनिवर पडलेले होते. जाकोब अजुनही तिला घट्ट पकडून होता.

'' तू वेडी आहेस की काय? ... मी तुला सांगितलं होतं की ज्या ब्लॅकहोलमध्ये तू कधी पुर्वी गेली नाहीस अश्या ब्लॅकहोलमध्ये जावू नकोस म्हणून...'' जाकोब रागाने म्हणाला.

'' हो पण... या ब्लॅकहोलमध्ये काय प्रॉब्लेम आहे?'' तिने आश्चर्याने विचारले.

'' ते तिकडे खडकावर काय लिहिलं आहे जरा बघ... धोका... चांगलं लाल अक्षराने लिहिलेलं आहे'' जाकोब त्या खडकाकडे तिचं लक्ष वेधून म्हणाला. अजुनही तो रागातच होता.

जाकोब अजुनही तिला घट्ट पकडून होता. तिने स्वत:ला त्याच्या पकडीतून सोडवून घेण्याचा प्रयत्न केला, पण जाकोबची पकड अजूनच घट्ट झाली. ती लाजली आणि तिने मान खाली घातली. जशी जाकोबची पकड सैल झाली तिने आपली सूटका करुन घेतली.

जाकोब उठून उभा राहाला. स्टेलाही लाल अक्षराने 'धोका' असं लिहिलेल्या त्या खडकाकडे पाहत उठली. ती असं लिहिलेला खडक या गुहेत प्रथमच पाहत होती. जाकोबने त्याच्या हातातल्या टॉर्चचा प्रकाश त्या खडकावर टाकीत म्हटले,

''बघ..''

तिथे खडकावर टॉर्चच्या प्रकाशात 'D4' आणि त्याच्या खाली लाल अक्षरात लिहिलेलं 'धोका' असं दिसत होतं.

'' हा ब्लॅक होल... आणि...'' जाकोब बाजुला जवळच असलेल्या एका ब्लॅकहोलवर, जिथे शेजारच्या खडकावर 'D5' आणि त्याच्या खाली 'धोका' असं लिहिलेलं होतं, तिकडे टॉर्चचा प्रकाश टाकीत म्हणाला, '' ... आणि..हा 'D5'.. 'D3' तर धोकादायक आहेच पण हे दोन ब्लॅकहोल 'D4' आणि 'D5' सुध्दा धोकादायक आहेत...''

जाकोबने पुन्हा आपल्या टॉर्चचा प्रकाश ज्या ब्लॅकहोलमध्ये थोड्या वेळापूर्वी स्टेला उडी मारणार होती त्या 'D3' वर केंद्रीत करीत म्हटले, '' या ब्लॅकहोलमध्ये ज्यात तू आता उडी मारणार होतीस त्यात तू गुदमरुन मेली असतीस ... कारण त्यात हवा नाही आहे... ''

'' आय ऍम सॉरी... माझं खरोखरंच त्या खडकाकडे लक्षच गेलं नाही '' स्टेला ओशाळून म्हणाली.


क्रमश:...


Quote of the day -

Don't go around saying the world owes you a living; the world owes you nothing; it was here first.

--- Mark Twain [Samuel Langhornne Clemens] (1835-1910)


Marathi books, Marathi proverbs, Marathi quotes, Marathi idioms, Marathi poems, Marathi lekh, Marathi writting, Marathi creation, Marathi Art, Marathi Bhasha

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

2 comments:

  1. hello Sunilji, is the Blackhole Novel incomplete? why don't you update it from a while? are you ok?

    by the way best of luck to you and we will pray for your selection.

    ReplyDelete
  2. Are u ok Sunilji? Why r u not postiing?? plz post next blogs.. i'm dying to read..

    ReplyDelete