Valuable quotes -
Life is the art of drawing sufficient conclusions from insufficient premises.
--- Samuel Butler (1612-1680)
स्टेलाने आलटून पालटून आपल्या टॉर्चचा झोत 'D4' आणि 'D5' विहिरीवर टाकीत जाकोबला विचारले,
'' 'D3' मध्ये हवा नाही त्यामुळे ते धोकादायक आहे हे कळण्यासारखं आहे पण ह्या 'D4' आणि 'D5' विहिरी का धोकादायक आहेत? ''
जाकोब चालत चालत 'D5' विहिरीजवळ गेला. तिथे ज्या खडकावर खाली 'D5' आणि 'धोका' असं लिहिलेलं होतं त्याच खडकावर एक जुनी घड्याळ ठेवलेली होती.
'' या दोन्हीही ब्लॅकहोलमध्ये हवा आहे पण तरीही हे दोन्ही ब्लॅकहोल्स तेवढेच धोकादायक आहेत..'' जाकोब म्हणाला.
जाकोबने स्टेलाच्या हाताला धरुन त्या घड्याळीजवळ नेले, '' ये.. इकडे तर ये''
स्टेला त्याच्याकडे पाहत त्याला काय म्हणायचे आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करु लागली. तिथे खाली खडकावर 'धोका' असं लिहिलेलं असल्यामुळे ती भितभीतच त्याच्यासोबत गेली.
'' भिऊ नकोस... फक्त लक्षात ठेव... की मी ज्या काही सुचना देईन त्या तंतोतंत आणि ताबडतोब अंमलात आणल्या गेल्या पाहिजेत...'' जाकोब तिची भिती दूर करण्याचा प्रयत्न करीत म्हणाला.
जाकोबने ती त्या खडकावर ठेवलेली घड्याळ उचलली आणि आपल्या घड्याळीसोबत पडताळून बघितली.
'' बघ आता दोन्हीही घड्याळात रात्रीचे 9.00 वाजले आहेत'' जाकोब म्हणाला.
त्याने ती जूनी घड्याळ पुन्हा खडकावर पुर्वीच्या जागेवर ठेवून दिली आणि स्टेलाला घेवून तो आता त्या विहिरीच्या काठावर गेला.
'' आता माझ्यासोबत या विहिरीत उडी टाक... आणि जसं मी मघा सांगितलं... आत नेहमी माझ्यासोबतच राहा...'' जाकोबने बजावले.
स्टेलाने होकारार्थी मान हलवली आणि दोघांनीही एकमेकांचा हात धरुन त्या विहिरीत उडी मारली.
जाकोब आणि स्टेलाला थोड्या वेळाने आपण एका दुसऱ्या खडकाळ गुहेत जमिनीवर पडलेलो आहोत असे आढळले.
'' चल लवकर उठ आणि माझ्या बरोबर धावायला लाग'' जाकोब घाईने उठून स्टेलाचा हात आपल्या हातात घेवून तिला उठायला मदत करीत म्हणाला.
जेव्हा ती उठून उभी राहाली, जाकोब तिचा हात आपल्या हातात घट्ट पकडून तिला आपल्याबरोबर जवळ जवळ ओढतच जोरात धावायला लागला. तो जोरात धावत होता आणि स्टेला त्याच्याबरोबर धावण्याचा निकडीने प्रयत्न करीत होती.
'' चल लवकर ... माझ्याबरोबर जोरात धाव...'' तो धावतांना म्हणत होता.
शेवटी धावता धावता ते एका विहिरीच्या काठावर येवून पोहोचले. त्या विहिरीच्या शेजारच्या खडकावर ' एक्सीट' असं लिहिलेलं होतं.
'' चल लवकर.. लवकरात लवकर माझ्यासोबत उडी मार'' जाकोब म्हणाला.
दोघांनीही एकमेकांचा हात धरुन त्या 'एक्सीट' विहिरीत उडी मारली.
जाकोब आणि स्टेला परत आधीच्या 'D' लेव्हलच्या खडकाळ गुहेत जमिनीवर येवून पडले. दोघांनाही वेगात धावल्यामुळे दम लागला होता. ते हळू हळू जमिनीवरुन उठले. जाकोबने आपल्या टॉर्चचा प्रकाश ज्या खडकावर ती जुनी घड्याळ ठेवली होती तिथे केंद्रीत केला आणि तो तिकडे जावू लागला. स्टेलाही त्याच्या मागे मागे जायला लागली. टॉर्चच्या प्रकाशात त्या खडकावर खाली 'D5' आणि 'धोका' असं लिहिलेलं दिसत होतं.
जाकोबने त्या खडकावर ठेवलेली घड्याळ उचलली आणि आपल्या मनगटावर बांधलेल्या घड्याळीशी जुळवून बघितली. स्टेलाही त्या दोन्ही घड्याळांकडे निरखून बघत होती.
''बघ या घड्याळीत रात्रीचे 7 वाजून 15 मिनीट झाले आहेत तर माझ्या घड्याळीत संध्याकाळचे 9 वाजून 3 मिनीट झाली आहेत.'' जाकोब म्हणाला.
'' बापरे... जवळ जवळ 2 तासांचा फरक... याचा अर्थ काय?'' स्टेला आश्चर्याने आपल्या मनगटावर बांधलेल्या घड्याळीकडे बघत म्हणाली. तिच्याही घड्याळीत 9 वाजून 3 मिनीटे झाली होती.
'' याचा अर्थ हाच की ... त्या ब्लॅकहोलमधील वेळेचे परीमाण वेगळे आहे... तिथे वेळ उलट्या दिशेने धावतो...'' जाकोब स्पष्टीकरण देत म्हणाला.
'' पण आपण तर फक्त तिनच मिनीट त्या ब्लॅकहोलमध्ये घालविले.'' स्टेला पुन्हा आपल्या घड्याळीकडे पाहत म्हणाली.
'' तिथे आत 3 मिनीट नंतर म्हणजे इथे 2 तास आधी '' जाकोब म्हणाला.
'' खरोखर किती अविश्वनिय!'' स्टेलाच्या तोंडातून आश्चर्योद्गार निघाले.
'' जर आपण तिथे त्या ब्लॅकहोलमध्ये जास्त वेळ घालविला तर शक्य आहे की आपण अश्या काळात पोहोचू की जेव्हा हे ब्लॅकहोलसुध्दा अस्तित्वात नव्हते...'' जाकोब म्हणाला.
'' त्याने काय फरक पडणार आहे?'' स्टेलाने न समजून विचारले.
'' पडणार आहे ना... जर 'एक्सीट' विहिरच अस्तित्वात नसेल तर तू परत कशी येशील... तू तिथे कायमची अडकशील'' जाकोबने स्पष्टीकरण दिले.
जाकोबने आपली स्वत:ची घड्याळ ज्यात 9.03 वाजले होते ती मागे करुन घेतली. आता त्याच्या घड्याळीत 7 वाजून 16 मिनीटे झालेले दिसत होते. स्टेलानेही त्याचं पाहून आपली घड्याळही मागे करुन घेतली.
क्रमश:...
Valuable quotes -
Life is the art of drawing sufficient conclusions from insufficient premises.
--- Samuel Butler (1612-1680)
Marathi novels, Marathi books, Marathi life, Marathi lifestyle, Marathi cities, Marathi state, Marathi people, About marathi, Marathi writers, Marathi cinema, Marathi songs, Marathi mp3
Kharo-khar BLACK-HOLE is Fanatastic....!
ReplyDeleteMICH BLACK HOLE MADHE ADAKLI KI KAY SHANKA WATAYALA LAGLI
ReplyDelete