Books - Black Hole CH-30 आरोप

Next Chapter Previous Chapter

This Novel in English

Valuable thoughts -

If you can't describe what you are doing as a process, you don't know what you're doing.

---- W. Edwards Deming


'त्या ब्लॅकहोलमध्ये वेळ उलटी कशी धावत असावी' असा विचार करीत असतांना स्टेलाने आपलीही घड्याळ दोन तास मागे करुन 7.16 वर आणून ठेवली. पण तिच्या डोक्यात अचानक एक विचार चमकला.

'' मला तर काळजी वाटत आहे की जर गिब्सनही अशाच एखाद्या ब्लॅकहोलमध्ये अडकला असेल तर?'' तिने आपली भिती जाकोबला बोलून दाखवली.

'' मला नाही वाटत असं होवू शकतं..'' जाकोब म्हणाला.

'' तू एवढा कसा विश्वासाने सांगू शकतोस?'' स्टेलाने विचारले.

'' कारण गिब्सनला सगळं माहीत आहे... त्याला या सगळ्या ब्लॅकहोलमधील सगळे नियम माहित आहेत...'' जाकोब म्हणाला.

स्टेलाने आपल्या टॉर्चचा झोत तिथेच बाजुला असलेल्या अजून एका धोकादायक ब्लॅकहोलवर टाकला. तेथील खडकावर 'D4' असं लिहिलेलं होतं आणि खाली लाल अक्षरात 'धोका' असं लिहिलेलं होतं. त्या खडकावर सगळ्यात खाली प्रिझमसारखी काहितरी आकृती कोरलेली होती, त्याने स्टेलाचं लक्ष वेधलं. तिला आठवलं की तिच्या स्वप्नातही एकदा असंच प्रिझमसारखं भिंतिवर कोरलेलं दिसलं होतं जे तिने स्पर्श करुन न्याहाळून बघितलं होतं.

'' D3 मध्ये हवा नाही आहे आणि D5 मध्ये वेळ उलट्या दिशेने चालतो तर मग या D4 मधे असं काय आहे की ते सुद्धा धोकादायक आहे?'' स्टेलाने विचारले.

जाकोब अचानक घाई करीत विषय बदलून म्हणाला, '' चल आता निघायला पाहिजे ... आधीच बराच वेळ झाला आहे''

जाकोब आता 'एक्सीट' विहिरीकडे चालू सुध्दा लागला होता. स्टेलाही त्याच्या मागे मागे जावू लागली. त्याच्या अचानक बदललेल्या मुडचं स्टेलाला आश्चर्य वाटत होतं.

'' जाकोब तू माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस'' स्टेला त्याच्या मागे मागे चालत म्हणाली.

तिही त्याला असंच सोडणार नव्हती.

जाकोब अजूनही समोर समोर त्या 'एक्झीट' विहिरीकडे चालत होता. स्टेला आता मागेच थांबून त्याला जातांना एकटक पाहत होती.

'' जाकोब ... हा ब्लॅकहोल धोकादायक का आहे जरा मला सांगशील का?'' स्टेला जवळजवळ ओरडूनच म्हणाली.

जाकोब चालता चालता जागच्या जागी थांबला आणि वळून तिच्याकडे पाहत म्हणाला,

'' आता सध्या मला सांगता येणार नाही... आता या क्षणी मी एवढंच सांगू शकतो की तो ब्लॅकहोलही बाकीच्या दोन्ही ब्लॅकहोल इतकाच धोकादायक आहे...''

'' मग केव्हा सांगणार आहेस?'' स्टेलाही हट्टाला पेटली होती.

'' जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा'' जाकोब म्हणाला.

जाकोब आता पुन्हा पुढे त्या 'एक्झीट' विहिरीकडे चालू लागला.

'' तू माझ्यापासून काहीतरी लपवित आहेस... '' स्टेला पुन्हा जोराने म्हणाली.

तरीही जाकोब थांबला नाही.

'' मला तर शंका येत आहे की तूच गिब्सनचा खून केलास'' स्टेला सरळ सरळ त्याच्यावर आरोप करीत म्हणाली.

आतामात्र तो थांबला.

'' मी गिब्सनला मारलं? ... का बर मी त्याला मारावं?'' जाकोबने प्रतिप्रश्न केला.

स्टेला त्याच्या जवळ आली आणि त्याच्या डोळ्यात पाहत खंबीरपणे म्हणाली,

'' मला हसील करण्यासाठी''

जाकोब उपहासात्मकरीत्या जोराने हसला.

'' मी त्याचा खून केला ... आणि का तर? .. तूला हासील करण्यासाठी? .. तू एक गोष्ट विसरीत आहेस की तो गायब झाल्यानंतर आपली भेट झाली'' जाकोबने आपला तर्क प्रस्तूत केला.

जाकोब तिच्याकडे चालत जावून तिच्या अजून जवळ गेला, त्याने त्याचा धीराचा हात तिच्या खांद्यावर ठेवून तिचा खांदा थोपटत म्हणाला, '' स्टेला... माझ्यावर विश्वास ठेव''


क्रमश:...


Valuable thoughts -

If you can't describe what you are doing as a process, you don't know what you're doing.

---- W. Edwards Deming


Marathi books, Marathi novels, marathi news, Marathi channel, Marathi vahini, Marathi entertainment, Marathi songs, Marathi maja, Marathi maza, marathmoli, marathi sanscruti, Sanskrit

This Novel in English

Next Chapter Previous Chapter

No comments:

Post a Comment